शिवसेनेला शेतीमधल काय कळत?: निलेश नारायण राणे

दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व महाविकास आघाडीने शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिवसेनेने देखील पाठिंबा दिला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत अधिकृत वृत्तांत दिले होते. शिवसेनेने या आंदोलनावरून भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी शिवसेनेवर खरपूस टीका केली आहे.  शिवसेनेला शेतीमधल काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषयच नाही. शिवसेनेला तेवढी अक्कल देखील नाही. फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना विरोध करायचा म्हणूनच शिवसेनेने शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे अशी जहरी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने देशात लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशभरात कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. निलेश राणे हे रत्नागिरी या ठिकाणी बोलत होते.

पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले शिवसेना हा  गोंधळलेला पक्ष आहे. शिवसेना पक्षाचा उतरता काळ सुरू झाला आहे. त्यामुळे शिवसेनेची किंमत देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. शिवसेनेला दिल्लीत कुणी किंमत देखील देत नाही. शिवसेना हा पक्ष कुठल्याच भूमिकेवर ठाम राहणारा पक्ष नाही.  शिवसेना  रोज खोटं बोलत असते . एक दिवस महाराष्ट्राची जनताच त्यांची दखल घेणं बंद करून टाकेल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.