शेतकर्‍यांना सन्मानाने दिल्लीत प्रवेश दिला नाही तर,महाराष्ट्रातून हजारो शेतकरी डेरा आंदोलन करतील; बच्चू कडू

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातला शेतकरी संतापल्याचे चित्र आहे. याचे पडसाद देखील देशभरातल्या अनेक भागात विविध माध्यमातून पाहिला मिळाले. सलग पाच दिवस या कायद्याविरोधात सिंघू आणि टिकरी या सीमांवर पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी लाखोंच्या संख्येने आपले आंदोलन करत असून, केंद्र सरकारने ठेवलेला प्रस्ताव देखील या शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे. जर आम्हाला जंतर-मंतर मैदानावर प्रवेश दिला नाही तर, दिल्लीमध्ये येणारे पाचही मार्ग आम्ही बंद करू!असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या शेतकऱ्यांसमोर प्रस्ताव ठेवला होता. सरकार शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्‍नावर,समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मार्गाने बुराडी मैदानावर आंदोलन करावं, असं देखील अमित शहांनी म्हटलं होतं. मात्र आम्ही बुराडी मैदानावर कधीही जाणार नाही. तो पार्क नसून एक प्रकारचा तुरुंग आहे असं शेतकऱ्यांनी म्हटलं. आणि जर आम्हाला जंतर-मंतर मैदानावर प्रवेश दिला नाही,तर दिल्लीला येणारे पाचही मार्ग आम्ही बंद करू. असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नाही तर, बच्चू कडू यांनी जर शेतकर्‍यांना सन्मानाने दिल्लीमध्ये येऊ दिले नाही,तर महाराष्ट्रातून हजारो शेतकरी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. बच्चू कडू हे विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने बोलताना पाहिला मिळतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.