अजब प्रेम की गजब कहानी; तीघी मिळून शोधतायत नवऱ्यासाठी चौथी बायको!

0

सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पाकिस्तानमध्ये एका कुटुंबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून भारतामध्येही त्याला कमालीचे व्हिज मिळाल्याचे दिसून आले आहे.

‘स्त्री’ काहीही सहन करू शकते, मात्र आपण हयात असताना आपल्या नवऱ्याने दुसरे लग्न करून सवत(सपत्नी) घरात आणणे हे स्त्रीला कदापीही सहण होणारी गोष्ट नाही. मात्र पाकिस्तानच्या सियासीकोट मधील एक कुटुंब याला अपवाद आहे.

एक नाही,दोन नाही,तर तब्बल तीन लग्न करून तिघींनाही आनंदात ठेवणाऱ्या सियासीकोट मधील एका कुटुंबाचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून,तिन लग्न करून तिन्ही पत्नीचा सांभाळ करणाऱ्या बाहद्दराचं नाव ‘अदना’ असं आहे. विशेष म्हणजे, पहिल्या पत्नीनेच अदनासाठी मुलगी शोधुन लग्न लावले. एवढेच नव्हे तर नंतर,दोघींनी मिळून अदनाचे तिसरं लग्न लावून देण्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

अदनाच्या पहिल्या पत्नीचे नाव, शुंभाल दुसऱ्या पत्नीचं शुभाना तर तिसऱ्या पत्नीचं नाव शाहीन असून पहिल्या पत्नीला३ तर दुसऱ्या पत्नीला दोन मुलं आहेत. अदनाच्या तिसऱ्या पत्नीला मुल नसल्यामुळे तिने शुंभालकडून एक मुलगी दत्तक घेतली आहे. एकाच घरात तीन सवती असूनही अदनाचे कुटुंब कमालीचे आनंदात असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या तिन्ही सवती मिळून अदनासाठी आणखी एक चौथी पत्नी शोधणार असल्याचा गजब प्रकार समोर आला आहे.

अदनाचे सध्याचे वय 22 वर्षे असून, 22व्या वर्षी तिन-तिन लग्न करण्याचा कारनामा अदनानने करून दाखवला आहे. साधारण या वयात तरुण नोकरीच्या शोधात असतो, आपले पोट भरताना धडपड करताना पाहिला मिळतो. मात्र अदना याला अपवाद आहे. त्याने पहिले लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी केले. अदनाने दुसरे लग्न विसाव्या वर्षी तर तिसरे बाविसाव्या वर्षी झाले.

अजब प्रेम की गजब कहानी असणाऱ्या या कुटुंबात भांडण कशावरून होत असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. अदनाची पहिली पत्नी शुंभाल म्हणते,माझे पती शुभानाला वेळ देत नाहीत,तर शुभाना म्हणते, माझे पती शाहिनला वेळ देत नाहीत. यावरून या कुटुंबात कधीकधी भांडण होतात असं अदनाच्या तिन्हीं पत्नींनी सांगितलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.