शरद पवार यांच्या अजून एका नातवाने केली समाजकारणात एन्ट्री
पवार घराण्यातील तिसऱ्या फळीतील राजकारणाचे वारसदार म्हणून रोहित पवार यांनी एन्ट्री केली. रोहित पवार यांनी जिल्हापरिषद सदस्य पदाच्या मार्फत राजकारणात प्रवेश केला. ग्राउंड लेव्हल ला काम करण्याच्या अनुभव घेतला. राजकारणातील बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या. लोकांशी नाळ जोडली.
रोहित पवार यांच्या राजकीय प्रवेशानंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. रोहित यांच्या तुलनेत पार्थ पवार यांनी राजकारणामध्ये यायला घाई केली. पार्थ यांना कुठलाही अनुभव नसताना देखील त्यांना मावळ मधून लोकसभेचे तिकीट दिले गेले. त्यांना स्टेज डेअरिंग नसताना देखील भल्यामोठ्या जनसमुदायासमोर उभे करण्यात आले. पार्थ यांच्या राजकीय प्रवेशाचे टायमिंग चुकले व पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागला.
पार्थ पवार यांच्या नंतर आता शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी समाजकारणात एन्ट्री केली आहे. विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. या संस्थेत विश्वस्त म्हणून युगेंद्र पवार यांची निवड शरद पवार यांनी केली आहे.
आज विद्या प्रतिष्ठानची जनरल मीटिंग पार पडली. यामध्ये विश्वस्तांची निवड करण्याचे अधिकार शरद पवार यांना आहेत. आज झालेल्या मीटिंग मध्ये शरद पवार यांनी तीन विश्वस्तांची निवड केली आहे.
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.