बारामती पोलीस स्टेशमध्ये लावलेल्या पाटीची राज्यभर चर्चा, सिंघम अधिकाऱ्याने अवैध धंदेवाल्यांची केली बत्ती गुल.
बारामती शहर हे संपूर्ण भारतामध्ये ओळखले जाते. त्याचं महत्वाचे कारण म्हणजे बारामती हे पवार साहेबांचे गाव. कदाचित बारामती एवढा विकास कुठल्या शहराचा झाला नसेल. बारामती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सदैव चर्चेत राहत असते. गेल्या दिवसांपूर्वी सावकारांच्या जाचाला कंटाळून प्रितम शहा यांनी आत्महत्या केलेल्या प्रकरणामुळे चर्चेत आहे.
पुणेरी पाट्यांप्रमाणे सध्या बारामती शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या पाटीची होताना दिसत आहे. शहर पोलीस स्टेशनमध्ये लवल्यात आलेली पाटी अशी आहे की, ‘लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. पोलीस स्टेशन येथे सर्व कामे विनामुल्य केली जातात. काही तक्रार असल्यास संपर्क साधा. अशी पाटी ‘पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्या ऑफिसमध्ये लावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी बारामतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस ठाण्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा. या उद्देशाने पोलीस ठाण्यात अनेक बदल केले आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पोलिसांकडून विश्वासाचे वातावरण मिळावे, तसेच पोलीस आपल्याला मदत करण्यासाठीच आहेत. अशी भावना सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या हेतूने अशा प्रकारची पाटी शहर पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातीमधील वेळापूर, खंडाळी,मळोली, श्रीपूर, तोंडले,बोंडले त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील काही पोलिस स्टेशनमध्ये आपल्या दमदार कार्याचा दमदार ठसा नामदेव शिंदे या खमक्या अधिकाऱ्याने या अगोदर उमठवला आहे. या परिसरातील गावगुंडांच्या दहशतीला आळा घातला आहे, खंडणी बहाद्दराना धडा शिकवला आहे. त्याबरोबर रोडरोमियोंना देखील आळा घातला होता. गावागावात असणारे वाद संपवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न करून यश मिळवले आहे . गोरगरीबांचा सिंघम अशी ओळख आजही कोल्हापूर जिल्ह्यात व सोलापूर जिल्ह्यात आहे. तसेच कामकाज त्यांनी बारामती शहरात सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे.
बारामती शहारामधील वाढलेले खासगी सावकरकीचे लोन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अगदी लोकांचे जीव घेण्याइतपत सावकाराची मजल गेलेली आहे. त्याच बरोबर जुगार अड्डे, बेकायदेशीर वाळू उपसा असे अनेक अवैध धंदे बारामती शहरात चालत असतात. नामदेव शिंदे या सिंघम अधिकाऱ्याने हे सर्व अवैध धंदे बंद करण्याचा विडा उचलला आहे. आता कशा पद्धतीने ते काम करत आहेत हे पाहणे आपणा सर्वांना औस्तूक्याचे ठरणार आहे.
कोणावरती अन्याय अत्याचार झाला तर शांत न बसता थेट मला संपर्क करा,तक्रार करा,अत्याचार करणाऱ्याला फक्त जेलच नव्हे,तर कायद्याची अद्दल काय असते ते दाखवतो. रोडरोमियो,गावगुंड,गोरगरिबांवर अन्याय करणारे गावपुढारी यांचा कायमचा बंदोबस्त कसा करायचा आणि पोलीसी खाक्या काय असतो,त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मी आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस हजर आहे. असं म्हणत बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी नागरिकांना अस्वस्त केले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.