एबीपी माझा या न्युज चॅनल वरती पंकजा का चिडल्या?

पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून मीडियाने आपल्या तत्वांमध्ये बदल केलेला दिसतो. बरेच मीडिया प्लॅटफॉर्म हे पक्षपाती वागत असल्याचे लोक बोलत असतात. टीका करत असतात. सतत काहीतरी मसालेदार शोधून काढून त्याच्यावरती बोंबाबोंब करत बसायचे ही नवीन पद्धत आली आहे.

स्वतः पंकजा मुंडे या ABP माझा या टीव्ही चॅनल वरती चिडल्या आहेत. त्यांनी ABP माझा ला माफी मागण्यास सांगितले आहे. कारण पंकजा मुंडे म्हणाल्या नाहीत तरी देखील एक ट्विट स्वतच्या मनाचे ABP माझा ने ट्विट केले आहे.

ABP माझा ने ट्विट केले होते की “मुघल परवडले परंतु महावीकास आघाडी परवडत नाही – पंकजा मुंडे”. मात्र हे वाक्य पंकाजांनी म्हणले नसताना देखील ABP माझा ने ट्विट केले आहे. यावर पंकजा मात्र चांगल्याच चिडल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या,
“अशा प्रकारचे स्टेटमेंट मी दिलेले नाही मी कधीही असे बोलत नाही. तत्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी. हे अत्यंत अयोग्य आहे व हे वारंवार होण्याबद्दल मला खंत वाटते.

‌एबीपी माझा ने याबाबत अद्याप काही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र अशा प्रकारे लोकांची दिशाभूल होणार असेल तर देशाचे भविष्य चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे हे मात्र नक्की. अशा प्रकारे वागणूक करून लोकशाही चा चौथा खांब खिळखिळा झाल्याशिवाय राहणार नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.