आमिर खानची मुलगी करतेय अमीर खानच्याच फिटनेस ‘कोच’ला ‘डेट’
बॉलीवूडच्या स्टार किड्स विषयी जाणूनघेण्या संबंधी चाहत्यांच्या मनात कमालीची उत्सुकता असल्याचे पहायला मिळते. करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर तर काही वर्षे सर्व माध्यमांची हेडलाईन्स बनला होता.
अशाच एका सुपरस्टारच्या मुलीच्या खासगी आयुष्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. बी टाऊन मधील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेता आमिर खान यांची मुलगी इरा खान एका जिम ट्रेनरच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चर्चेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे हा जिम ट्रेनर दुसरा तिसरा कोणी नसून आमीर खानचाच फिटनेस कोच आहे. आमिर खानचा फिटनेस कोचच इरा खानचा बॉयफ्रेंड असल्याने या बातमीला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जातंय.
याविषयी ठोस काही वृत्त नसलं तरी, नुपूर शिखरे याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ट्रॅडिशनल ड्रेसवरचा फोटो पोस्ट करत हॅप्पी दिवाली असं कॅप्शन लिहिलं आहे. नुपूर शिखरे याच्या पोस्टला इरा खाननेही ‘that we do’ अशी कमेंट केली असल्याने हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातंय. एवढेच नव्हे तर, लॉकडाऊनच्या काळात दोघेही महाबळेश्वर व्हेकेशनवर गेल्याचे वृत्तही समोर आले होते. दोघेही एकमेकांच्या कुटूंबाला भेटल्याची माहिती आहे.
इरा खान या अगोदर मिशाल क्रिपलानी याला डेट करत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. या दोघांच्या ब्रेक-अप नंतर इरा खानने आपला ‘दिल’ नुपूर शिखरेच्या हातात दिला आहे. आता हे रिलेशनशिप किती दिवस टिकतंय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या दोघांच्या रेलेशनशिप विषयी इरा खानची आई म्हणजेच,आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता यांनी काहीही स्पष्टीकरण दिले नाही.
मात्र आमिर खानच्याच फिटनेस कोच बरोबर इरा खान रिलेशनशिपमध्ये आहे,या बातमीमुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम