सट्टेबाजी ला मान्यता द्या; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

0

सट्टेबाजीला अधिकृत पणे मान्यता दिल्यास गैरप्रकारांना आळा बसवता येईल व अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. तसेच मॅच फिक्सिंग सारख्या घटना थांबवता येऊ शकतील, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. सट्टेबाजीला अधिकृत मान्यता मिळायला हवी अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना ठाकूर यांनी असे मत व्यक्त आहे. देशात सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्यासाठी कार्यरत असलेल्या तसेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य असलेल्या नीलेश शाह यांनी केलेल्या सूचनेला प्रतिउत्तर दिले आहे.

खरतर भारतासारख्या देशामध्ये अनधिकृत सट्टेबाजी, जुगार खेळणे हे प्रकार काही कमी नाहीत. आत्तापर्यंत याच्यावर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आहे. मात्र अवैधरित्या सट्टेबाजी, जुगार चालू आहे. त्यामुळे आपल्याला महसूल सुध्दा मुकावा लागत आहे.

निलेश शाह पुढे बोलताना म्हणाले की, ‘‘पैज लावणे हे भारतीयांच्या रक्तातच आहे.अनेक ठिकाणी सट्टेबाजी ला मान्यता आहे. लास वेगास, मकाऊ तसेच नेपाळसारख्या ठिकाणी सट्टेबाजीला अधिकृत मान्यता आहे. जुगार किंवा सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी माझी सूचना आहे.’’ यावर प्रत्युत्तर देत ठाकूर म्हणाले की, ‘‘ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये सट्टेबाजीला अधिकृत मान्यता आहे.

अधिकृत मान्यता असेल तर देशाला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळतो. हा पैसा अन्य कामांसाठी तसेच खेळाच्या सुधारणेसाठी वापरता येऊ शकतो. सट्टेबाजीची पद्धत रूढ असते. सट्टेबाजीशी निगडित असलेल्यांना ही पद्धत योग्य ठरू शकेल. सट्टेबाजीमुळे मॅचफिक्सिंग सारखे प्रकार टाळता येऊ शकतात.’’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.