मुळशी पॅटर्नच्या रिमेमध्ये सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत!

0

प्रविण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न चित्रपट या चित्रपटाचा रिमेकचे शूटिंग सध्या पुण्यामध्ये सुरू असून या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असल्याची माहिती आहे.

या चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये होणार असून, ओम भुतकर च्या भूमिकेत आयुष शर्मा दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिकेत सलमान खान दिसणार असल्याने या चित्रपटाची खूपच चर्चा आहे.

‘अंतिम.. द फायनल ट्रुथ’ असं या चित्रपटाचं नाव असून, तो कधी प्रदर्शित होणार आहे हे अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. मात्र या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत असल्यामुळे हा चित्रपट कमालीचा चर्चेत असणार आहे.

या चित्रपटाचे काही सीन आज पुण्यामध्ये शूट करण्यात आले. पुण्याविषयी महेश मांजरेकर म्हणाले, पुणे हे शहर खूपच फ्रेंडली आहे. पुण्यामध्ये शूट करण्यास नेहमीच मजा येते. यावेळी देखील ती आली. असं महेश मांजरेकर म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.