Bigg Boss 17 winner: टॉप 2 मधून मुनव्वर फारुकी बाहेर! या स्पर्धकाची बाजी, आज होणार घोषणा..

0

Bigg Boss 17 winner: बिग बॉस सीजन 17 (bigg Boss season 17) या रियालिटी आज समाप्ती होणार आहे. रात्री विजेत्याची घोषणा करण्यात येणार असून बिग बॉस सीजन 17 ची ट्रॉफी कोण जिंकणार याविषयीच्या प्रेक्षकांमध्ये आता उत्सुकता लागली आहे. मात्र तत्पूर्वीच विजेत्या स्पर्धकाचे नाव समोर आल्याने, खळबळ माजली आहे.

बॉस रियालिटी शोची लोकप्रियता अफाट असली तरी हा शो प्रचंड वादग्रस्त देखील राहिला आहे. नेहमी प्रमाणे बिग बॉस सीजन 17 शो देखील वादग्रस्त ठरण्याची कारण म्हणजे, अनेक स्पर्धकांच्या खाजगी आयुष्यामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. यात सगळ्यात अग्रेसर नाव मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) या स्टॅन्ड अप कॉमेडियन स्पर्धकाचे नाव समोर येतं.

मुन्नवर फारुकीला संपूर्ण स्पर्धेत टॉप व्होटिंग मिळाली आहे. आता मात्र मुन्नवर फारुकी आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आज रात्री बिग बॉस विजेत्यांची घोषणा होस्ट सलमान खान करणार आहे. रात्री बारा वाजता विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र विजेत्याचे भवितव्य लोकांच्या हातात आहे. वोटच्या आधारावर विजेता निवडला जाणार आहे.

ग्रँड फिनाले दमदार करण्यासाठी या शोचे माजी स्पर्धक डान्स परफॉर्मन्स करणार आहेत. विजेता ठरवण्यासाठी या शोमध्ये व्होटिंगची महत्वपूर्ण भूमिका असते. फारुकी गेल्या अनेक आठवड्यांपासून ट्रेंडिंगवर होता. मात्र आता व्होटिंगच्या बाबतीत टॉप दोन स्पर्धकांमधून फारुकी बाहेर पडला आहे. आता बिग बॉस 17 ची ट्रॉफी मिळवण्यासाठी अंकिता लोखंडे (ankita Lokhande) आणि अभिषेक कुमार (Abhishek Kumar) यांच्यामध्ये रेस असल्याची माहिती आहे.

मात्र बिग बॉस सीजन 17 चा फायनल उत्सुकता वाढवण्यासाठीचा हा प्लॅन असल्याचे बोलला जात आहे. मुन्नवर फारुकी व्होटिंगच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असल्याचीही माहिती आहे.एकाच वेळी अनेक मुलींना डेट करत असल्याने फारुकीची लोकप्रियता कमी झाली होती. या सगळ्या प्रकरणानंतर मुन्नवर फारुकीची गर्लफ्रेंड नाझिया सीताशीने देखील सोशल मीडिया वरून ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती.

हे देखील वाचा Indian Army Recruitment 2024: भारतीय सेनामध्ये 381 जागांसाठी मेगा भरती; कोणाला करता येणार अर्ज? वाचा सविस्तर..

Smriti Mandhana marriage date: स्मृती मंधानाचं ठरलं! या व्यक्तीबरोबर करणार शाही विवाह सोहळा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.