काली पूजेला उपस्थित राहिल्यामुळे मुस्लिम क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी!

0

गुरुवारी पश्चिम बंगालच्या बालाघाट परिसरातील काली पूजेच्या उद्घाटनासाठी गेलेल्या बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसनला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

शकीब अल हसनला जीवे मारण्याची धमकी एका धर्मांध व्यक्तीने दिली आहे. ही धमकी त्याने स्वतःच्या फेसबुक लाईव्ह वरून दिली आहे. कालीपूजाचे उद्घाटन करण्यासाठी शकिब पेट्रापोल सीमेवरून कोलकात्याला पोहोचलला होता. यादरम्यान तो मूर्तीसमोर प्रार्थना करताना दिसला होता.

शाकिब अल हसन हा कार्यक्रम करून बांगलादेशला गेल्यानंतर शुक्रवारी त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली. या घटनेनंतर लगेच त्याने माफी मागत स्पष्टीकरण दिले.

शकीब अल हसन म्हणाला, मी एक जागृत मुसलमान आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. मी स्वतःला गौरवशाली मुसलमान समजतो. चुका माणसाकडून होतात मी जर चुकलो असलो तर मी जाहीरपणे माफी मागतो. असं शाकिब अल हसन म्हणाला. मात्र ही चूक मी जाणीवपूर्वक केली नाही,असंही ही तो म्हणाला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.