युतीधर्म कसा पाळायचा ते नितीशकुमार यांच्याकडून शिकावे: फडणवीस

0


बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये एनडीए ला यश मिळवता आले. युतीधर्म कसा पाळायचा, हे शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री

जाहिराती साठी संपर्क करा व्हॉट्सअँप फक्त. +919373403078

नितीशकुमार यांच्याकडून शिकावे, अशी जहरी टीका  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर नाव न घेता  केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत NDA ला सत्ता मिळाली असून नितीशकुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र तेजस्वी यादव यांनी देखील बिहार विधानसभा निवडणुकीत आपली छाप उमटवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू”.

बिहार निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले भारतीय जनता पार्टीने नेहमीच दिलेला शब्द पाळला आहे. संयुक्त जनता दलाबरोबर युती केल्याने कोणाला कितीही जागा मिळवता आल्या  तरी नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आम्ही नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री करणार आहोत.  महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीआधी भाजपचा मुख्यमंत्री होईल, हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितले होते. त्यामुळे आम्ही  शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्याचा प्रश्नच नव्हता.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ” शिवसेना मात्र आमच्याबरोबर सत्तेत  होती. परंतु शिवसेनेने नेहमी  विरोधी पक्षांप्रमाणे  वर्तन केले. शिवसेनेने नेहमी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपवर  कायमच   टीका केली, ‘सामना’ मधून आमच्याच विरोधात जाणूनबुजून  टिकास्त्र सोडले जात होते. सत्तेत राहून फळे चाखायची आणि भाजपला दोष  द्यायची, हे शिवसेनेचे वागणे  योग्य नव्हते”, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेने  कमी जागा निवडून आल्याबद्दल भाजपला दोष दिला. त्यांच्या पराभवाचे खापर आमच्या डोक्यावर फोडले. त्यांचे उमेदवार भाजपाने  पाडल्याचा आरोप केला. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या  जागा अधिक  आल्या, म्हणून नितीशकुमार यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली नाही, किंवा त्याबद्दल आम्हाला जबाबदार धरले नाही.  एकमेकांबद्दल विश्वास हवा. नितीशकुमार यांनी तसे आचरण केले. शिवसेनेने कायमच विरोधी पक्षाची भूमिका निभावली. शिवसेनेला आम्ही कधीच मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता.

खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/JtkF5Gty52NJmGfcl5NBCT

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.