प्रधानमंत्री किसान सन्मान योजना: लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर २००० रुपये जमा होणार. अधिक जाणून घ्या

0

प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत केंद्र सरकार

दरवर्षी ६००० रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत असते. २००० रुपयांच्या ३ टप्प्यात हे सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात.  प्रधानमंत्री किसान योजनेची सुरुवात उत्तरप्रदेश मध्ये झाली होती. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा फायदा होत आहे. पच्चीम बंगाल हे राज्य सोडले तर सर्व राज्य या योजनेचा फायदा घेत आहेत.

जर आपण या योजनेसाठी रजिस्टर केले असेल व आपल्याला बँकेचा मेसेज आपल्या खात्यात पैसे जमा झाल्याचा आला नसेल तर आपण स्वतः आपल्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे का नाही? हे पाहू शकता.  त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम pmkisan.gov.in  या वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करावे लागेल.  नंतर खालील प्रमाणे वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर आपण ‘Farmers Corner’ वर क्लिक करावे. नंतर  ‘Beneficiary Status’ वर क्लिक करावे. त्याच्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर, आधार नंबर, व खाते नंबर टाकून आपण माहिती मिळवू शकता.
खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉईन व्हा

https://chat.whatsapp.com/CHV0jZ46YBuHzyyci6l7MC

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.