कर्जत मधील एका ठिकाणी वडापाव खाण्यासाठी शिल्पा शेट्टीने थांबवली गाडी; व्हिडिओ व्हायरल

0

अनेक मुंबईकरांसाठी व मराठी माणसाला वडापाव म्हणजे आवडीचा विषय. कढईतील तेलातून तळलेला खुसखुशीत गरम वडा, त्याच्याबरोबर पाव, चटणी आणि मिरची…हे चित्र डोळ्यांसमोर येताच तोंडाला पाणी सुटतं. गेले अनेक महिने बऱ्याच वडापाव प्रेमींना वडापाव ची चव चाखायला मिळाली नाही.

https://www.instagram.com/p/CHU3Vl9Beiw/?igshid=de8it53kxvrd

यात मग सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. रस्त्यावरचा वडापाव म्हणजे वॉटकरुंच्या पोटाला फार मोठा आधार. वडापाव म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा विषय. मुंबईमधील रोज काबाडकष्ट करून जगणाऱ्या लोकांना वडापाव म्हणजे खूप मोठा आधार.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कर्जतहून मुंबईला परत येताना रस्त्यावर वडापावची गाडी दिसली. मग काय.. गरमागरम वडापाव खायचा मोह तिलासुद्धा आवरला नाही. तिने गाडी थांबवली आणि वडापाववर ताव मारला.शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्या गाडीत बसून वडापाव खात आहे. ‘ काही अभिनेत्री व अभिनेते आपले आयुष्य असेच साध्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत असतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतात.

चलते चलते देखा वडापाव, मन ने बोला संडे है तो खाओ खाओ खाओ.. बनता है भाऊ’, असं कॅप्शन तिने या व्हिडियोसाठी दिले आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. शिल्पाच्या चाहत्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.