मार्कस स्टॉयनिस सलामीला!
दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल२०२०चा दुसरा क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही सामन्यात पॄथ्वी शॉच्या सुमार कामगिरीमुळे आजच्या सामन्यात त्याला वगळण्यात आले. त्याच्या जागी सलामीवीर म्हणून आतापर्यंत मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला दिल्ली कॅपिटल्स आज सलामीला पाठवले.
मार्कस टॉयनिसने बिग बॅश लिंगमध्ये सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी केली होती. आज तो दिल्लीकडून सलामीला आल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. त्याचबरोबर चाहत्यामध्ये आज तो अशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र त्याने संघाचा आणि चाहत्याचा विश्वास सार्थ ठरवत त्याने २७ चेंडूत ३८ धावा केल्या.
शिखर धवनने आणि मार्कस टॉयनिसने पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकात ८६ धावांची सलामी दिली.
ताजे वृत्त हाती आले तेंव्हा दिल्लीने ९.२षटकात १०० धावा केल्या आहेत. शिखर धवनने ताबडतोप अर्धशतक झळकावले. त्याने २९ चेंडूत ५६ धावा केल्या आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम