आपल्या चीमुकलीसाठी सुकन्या समृद्धी योजना; जाणून घ्या अधिक

0


१० वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या कन्येच्या शिक्षण घेण्यासाठी व तिच्या लग्नाच्या खर्चासाठी लागणारी रक्कम तुम्ही तिच्या लहानपणापासूनच थोडी थोडी गुंतवणूक करत करत जर आपल्याला तिच्या लग्नाच्या वेळी किंवा शिक्षणाच्या खर्चाच्या वेळी मिळवायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल.

सर्वसाधारण लोक शेअर बाजारात गुंतवणूक करत नाहीत. त्याचसोबत फिक्स डीपोझिट चे व्याजदर सुध्दा आजकाल कमी आहेत. तुमच्यासाठी आपल्या कन्येच्या भवितव्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा चांगला पर्याय आहे. आपल्याला जी रक्कम मिळते त्या रकमेवर इन्कम टॅक्स लागू होत नाही. म्हणजे हा सुध्दा आपला फायदाच आहे. महत्त्वाचे म्हणजे आपण हे खाते फक्त २५० रुपयांपासून काढू शकता. प्रत्येक वर्षी तुम्ही किमान 250 रुपये जमा करणे गरजेचे आहे. 250 पेक्षा जास्त रक्कम तुम्ही गुंतवू शकता ते वार्षिक दीड लाखापर्यंत.

सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही “बेटी बचाव बेटी पढाव” या संकल्पनेतून साकार झाली आहे. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत आपण आपल्या मुलीच्या भविष्यासाठी थोडी थोडी गुंतवणूक करू शकता. छोटी बचत योजनेमध्ये सुकन्या समृद्धी योजना ही अगदी योग्य योजना आहे. २०१६ – १७ साली 9.1 टक्के एवढा व्याजदर या योजनेअंतर्गत असणाऱ्या रकमेचा देण्यात आला होता. त्याआधी 9.2 टक्के एवढा व्याजदर मिळत होता.

ही योजनाच मुळात अशा लोकांसाठी बनवलेली आहे जे लोक आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी जे लोक बचत करत आहेत व पैसे गोळा करत आहेत अशा लोकांना सहाय्य म्हणून ही योजना आहे व जे लोक सर्वसामान्य आहेत. ज्या लोकांना आपल्या मुलीच्या लग्नाच्या व शिक्षणाच्या खर्चाच्या वेळी एवढी रक्कम एकदम उपलब्ध करत येणार नाही अशा लोकांसाठी ही योजना लाभदायक ठरेल.

मुलीचा जन्म झाल्यापासून 10 वर्षांपर्यंत तुम्ही हे खाते उघडू शकता. मुलीला वयाची 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. 50 रुपयांमध्ये तुम्ही तुमचे खाते उघडणे गरजेचे आहे. एका आर्थिक वर्षात तुम्ही 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये आपण योजनेचा फायदा घेऊ शकता.

तुमच्या मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षांपर्यंत ही योजना चालवू शकता तसेच मुलीचे 18 वर्ष वय पूर्ण होऊन तिच्या लग्नाच्या खर्चासाठी तुम्ही हे पैसे वापरू शकता. तुम्ही मुलीच्या वयाचे 18 वर्ष  पूर्ण झाल्यानंतर शिक्षणासाठी आपल्या रकमेतून 50 टक्के रक्कम काढू शकता. अधिक माहिती आपल्या पोस्ट ऑफिस मधून मिळावा.

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप ग्रुपला खालील लिंक वरून जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/CHV0jZ46YBuHzyyci6l7MC


आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.