अर्णव गोस्वामी प्रकरणावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

0

.
पत्रकार अर्णव गोस्वामी यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्णव गोस्वामी हे नेहमीच मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन यांना टार्गेट करून पत्रकारितेच्या मर्यादा ओलांडून आपल्या मनाप्रमाणे भाषा वापरत होते. त्यांच्या या मुद्द्याचे भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अर्णव गोस्वामी याने महाराष्ट्र शासन व मुंबई पोलीस यांच्या वरती आरोपांचे ताशेरे ओढले. मात्र शेवटी सुशांत राजपूत यांनी आत्महत्या केल्याचे सीबीआयने जाहीर केले.

याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता,” अर्णव गोस्वामी यांना केलेली अटक हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. अर्णव गोस्वामी हे  प्रकरणे ह्यांची बाहेर काढतात त्यात ह्यांना अटक करता आली नाही. मग त्यात त्यांच्या टीआरपी ची फाईल काढायची. २०१८ ला त्यांची क्लोज झालेली फाईल काढली. आलीबाग ला त्यांच्या ऑफिस चे काम केलेल्या व्यक्तीने सुसाईड नोट लिहिल्या म्हणे.

त्यावेळी चौकशी होऊन ती फाईल क्लोज झालेली आहे. आता ती २०२० ला ओपन करून खुन्नस काढण्याचा प्रयत्न झाला. आणीबाणी मध्ये सुद्धा इंदिरा गांधी यांनी असा प्रयत्न केला आहे.  त्यावेळी सुद्धा आणीबाणी संपल्यानंतर काँग्रेसला लोकांनी घरी पाठवले. अपघाताने यांचे सरकार आले आहे हे किती दिवस लोकांना वेठीस धरणार आहेत. महाराष्ट्र मध्ये आम्ही आंदोलन उपोषण करणार आहोत.

पत्रकार बांधवांना सुद्धा मला सांगायचे आहे म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सुखावतो. अर्णव गोस्वामी हे जरी जात्यात असले तरी आपण सुपात आहात आपण याचा कडाडून विरोध केला पाहिजे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.