राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर. या नेत्यांची लागणार वर्णी.
गेली अनेक दिवस प्रलंबित असणारी राज्यपाल नियुक्त आमदार प्रक्रिया मार्गी लागली आहे. कारण गेले काही दिवस राज्यपाल महोदयांनी ही प्रक्रिया स्थगित केली होती. महाविकास आघाडी सरकारला मात्र या राज्यपाल नियुक्त आमदार पदाची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावायची होती. अखेरीस राज्यपालांनी यास मंजुरी दिली व व पुढील मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, व काँग्रेस या पक्षामधून कोणाची वर्णी लागणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले. वेगवेगळ्या नेत्यांची नावे सर्वत्र जाहीर झाली. बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार असून आज उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे सोमवारी या बारा आमदारांची यादी राज्यपाल यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. तीनही पक्षातील उमेदवारांची नावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत. या यादीमध्ये कोणाची नावे आहेत हे अद्यापही समजू शकले नाही. मंत्रिमंडळाने सार्वमताने नावे राज्यपालांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी ही यादी राज्यपाल महोदयांकडे दिल्यानंतर राज्यपाल या यादीमधील उमेदवारांची नावे जाहीर करतील. अद्यापही या यादीमध्ये कोणाची नावे आहेत हे मात्र जाहीर झाले नाही. यादीमधील नावांमध्ये कोणाची नावे असतील याबाबत मात्र उत्सुकता लागली आहे. तिन्ही पक्षांमध्ये या यादीमध्ये कोणाची नावे असतील याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. आता कोणाची वर्णी राज्यपाल नियुक्त आमदार पदी लागेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम