प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल!

0

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुझा आणि त्याच्या पत्नीवर पैशाची फसवणूक केल्याप्रकरणी गाझियाबाद सिहानी गेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कहानी गेट पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून, मोटेरा येथील रहिवासी असणारा सतेन्‍द्र त्यागी यांच्याकडून रेमो आणि त्याच्या पत्नीने एका चित्रपटासाठी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

२०१३ मध्ये एका चित्रपटासाठी पाच कोटी रुपये माझ्याकडून रेमो डिसुझा आणि त्याच्या पत्नीने घेतले. एका वर्षात दुप्पट देण्याचा करार झाला होता. मात्र मला माझी मुद्दलही दिली नाही. असं सतेन्‍द्र त्यागी यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

अमर मस्ट डाय’ नावाचा चित्रपट काढण्यासाठी सतेन्द्र त्यागी यांच्याकडून रेमो डिसूजा आणि त्यांच्या पत्नीने पाच कोटी रुपये एका वर्षात दुप्पट माघारी देतो, म्हणून घेतले होते,असं सतेद्र यांचे वकील मोहनीश जयंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रेमो डिसुझा आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.