परदेशातील कांदा दाखल झाल्याने कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता

0

देशातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांचे देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी कांद्याच्या उत्पादनात विक्रमी घट झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे कांद्याला चांगला दर मिळू लागला होता,मात्र केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी आयात निरीक्षण शुल्क माफ केले.

केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात निरीक्षण शुल्काबरोबर निर्यातबंदी केली. केंद्र सरकारने आता आयातही सुरू केली असून आयात निरीक्षण शुल्कही माफ केल्याने आता इराणमधील कांदा मुंबईच्या बंदरावर दाखलही झाला आहे.

इराण, इजिप्तचा कांदा देशात दाखल झाल्यामुळे,आयात निरीक्षण शुल्क केंद्राने माफ केल्यामुळे,त्याचबरोबर कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळे,केंद्राने घेतलेल्या अशा अनेक निर्णयामुळे येणारा काळ हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगला नसल्याचं बोलले जात आहे.

मध्यप्रदेश मधील नवीन कांदा आता मार्केटमध्ये दाखल झाला आहे. इराण आणि मध्य प्रदेश मधील कांद्यापेक्षा महाराष्ट्रातील कांद्याची प्रतवारी चांगली आहे. मात्र इजिप्त इराण या देशांमधून कांदा आल्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर याचा परिणाम नक्कीच होणार असल्याचे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.