सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये: प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी व पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. गेले अनेक दिवस बरेच राजकीय नेते मंडळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची पाहणी करण्यासाठी नुकसानग्रस्त भागात दौरे करत आहेत. शरद पवार यांचा देखील दौरा उस्मानाबाद या ठिकाणी झाला. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बांधावरती जाऊन नुकसान पाहणी केली.

कणकवली मध्ये प्रवीण दरेकर यांनी शेतीच्या नुकसानाचा आढावा घेतला. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.कणकवली मध्ये देखील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे असे प्रवीण दरेकर म्हणाले. कोकणासाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे असे विधान प्रवीण दरेकर यांनी केले.

पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “पावसामुळे कोकणची शेती व शेतकरी उध्वस्त झाला आहे. पीक गेले आहे जमिनी देखील गेल्या आहेत, जमिनी खरवडायला गेले तर त्यालाही खर्च आहे. मी आणि देवेंद्रजींनी अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त भागात दौरा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव आणला. आम्हाला असे वाटले होते की सरकार भरीव मदत करेल. परंतु सरकारने जी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे.”

‌”पश्चिम महाराष्ट्र मध्ये पाच एकर दहा एकर अशा प्रकारच्या जमिनी शेतकऱ्यांना आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी साधन आहेत. कोकणामध्ये पाच गुंठे, दहा गुंठे, चाळीस गुंठे अशा प्रकारची शेती शेतकऱ्यांना आहे. मग 10 हजार 1 हेक्टरला मदत जाहीर झाली आहे ती मदत शेतकऱ्यांची थट्टा उडवणारी आहे. कारण दहा गुंठे वीस गुंठे अशी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांची थट्टा उडवणारी असेल.”

‌ “10000 कोटी मधील 5500 कोटी रुपये हे शेतीसाठी मिळणार आहेत व अन्य रक्कम नगर विकास रस्ते पूल यासाठी मिळणार आहेत.
‌ तीनशे कोटी नगर विकास, 239 कोटी ऊर्जा साठी आहेत, रस्ते पुलांसाठी 2600 कोटी आहेत. म्हणजेच 50 ते 55 रुपये एका गुंठा साठी मिळणार आहेत. तुम्ही असे पन्नास पंचावन्न रुपये देऊन शेतकऱ्यांची कशाला थट्टा करता? म्हणून माझी मागणी आहे की कोकणासाठी विशेष पॅकेज एक वेगळे धोरण आणून देण्यात यावे.” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.