देवेंद्र फडणवीस यांची काळजी सरकार घेईल: खासदार संजय राऊत

0

काल राज्याचे विरोधी पक्षनेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता, संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले “आम्ही देवेंद्रजी ना सांगत होतो काळजी घ्या संकट फार भयानक आहे, कोरोना कोणालाही सोडत नाही. ते नेहमी म्हणत होते मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सतत टार्गेट करत होते. तुम्ही जात नाही, तुम्ही बाहेर पडत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणत होते. आम्ही सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीमध्ये चांगलं बदल व्हावा व ते लवकर बरे व्हावेत यासाठी आई जगदंबे कडे प्रार्थना करतो.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे शासकीय दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, यावर विचारले असता संजय राऊत म्हणतात,” ही चांगली गोष्ट आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते. ते महत्त्वाचे नेते आहेत. काही आदर्श व परंपरा आपण पाळल्या पाहिजेत. ते ज्या इस्पितळात दाखल झाले आहेत ते सरकारी आहे. तेथेही त्यांना लवकरात लवकर आराम मिळावा त्यांना सर्व सुविधा उपचार मिळावेत यासाठी सरकार संपूर्ण काळजी घेईल. तशा सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून देखील गेल्या आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.