अजब…! गृहपयोगी वस्तू आणण्यासाठी ‘गोल्डमॅन’ कडून पत्नीचा छळ!

0

‘गोल्डमॅन’ म्हणून राज्यभर परिचित असणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या सनी वाघचौरे याला गृहउपयोगी वस्तूंसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची अजब घटना घडली आहे.

अंगावर किलोभर ‘सोनं’ परिधान करणारा माणूस आपल्या पत्नीचा केवळ गृहोपयोगी वस्तूंसाठी छळ करतो. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून, गृहउपयोगी वस्तू मी माझ्या आई-वडिलांकडून आणाव्या, यासाठी माझा छळ करण्यात आला. याच्यामध्ये सासू-सासरे ननंद यांचा समावेश आहे. अशी माहिती सनीच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे. तशी गुन्ह्यात पोलिसांनी नोंदही केलेली आहे.

सनी वाघचौरे याचे बॉलीवुडशी संबंध आहेत. अभिनेता विवेक ओबेराय यांचा,सनी जवळचा मित्र असल्याचं बोललं जातं. द कपिल शर्माच्या शोमध्ये विवेक ओबेरॉय उपस्थित असणाऱ्या ‘शो’मध्ये देखील सनी वाघचौरे ऑडियन्समध्ये उपस्थित होता.

धक्कादायक बाब म्हणजे,पत्नी गर्भवती असताना गर्भपाताची औषधं देऊन गर्भपात केल्याचा आरोपही सनी वाघचौरे यांच्यावर आहे. मारहाण शिवीगाळ मानसिक त्रास, असे अनेक गुन्हे पत्नीच्या सांगण्यावरून पोलिसांनी दाखल केले आहेत. विशेष म्हणजे 2011 पासून हा छळ होत असल्याचा आरोप सनीवर आहे.

सोन्याच्या दागिन्यांवर त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात फसवलंय, स्वतःची पत्नी घरी असताना,तो इतर महिलांना घरी आणायचा. विशेष म्हणजे हे त्याच्या घरच्यांच्या डोळ्यादेखत व्हायचे. तरीसुद्धा त्याला कोणी काहीही बोलत नव्हते. हे सगळं सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने,त्याची पत्नी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर दरम्यानच्या काळात तडजोडीचे काही प्रयत्नही करण्यात आले. परंतु तडजोड झाली नाही,आणि शेवटी सनी वाघचौरे याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सनी वाघचौरेला अद्याप अटक झालेली नाही. परंतु कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.