लग्नाचे नाटक करून तब्बल दहा नवरदेव लुटले.

0


यावर्षी कोरुना काळात देखील अनेक लग्न झाली.   यामुळे सर्वसामान्य लोकांचे देखील पैसे वाचले व लग्नासाठी होत असलेला अवाढव्य खर्च  सर्वसामान्यांचा वाचला.

दरम्यान गणेश भाऊसाहेब पवार हा 27 वयाचा तरुण आपल्या लग्नासाठी वधूंचा शोध घेत होता. एके दिवशी त्याच्या वहिनीला म्हणजेच भावाच्या बायकोला सविता माळी या महिलेने फोन करून तीन ते चार मुलींचे बायोडेटा पाठवले. त्यांनी सविता माळी या मुख्य आरोपी वरती विश्वास ठेवून अर्चना शिंदे या मुलीच पसंत केले. त्यांनी फोटो व आधार कार्ड देखील यांना पाठवले होते. त्यासोबत  सविता माळीने डुप्लिकेट टीसी देखील पाठवून दिला.

त्यानंतर वधूच्या घरच्यांकडून दीड लाख रुपये हुंडा व अंगावर सोने घालण्याची अट घातली तीदेखील नवरदेव व कुटुंबीयांनी मान्य केली. अखेर लग्नाचा दिवस ठरला. कोरोनामुळे एकाच दिवसात लग्न करायचे असल्याचे सांगून सविता माळीने नवरदेव व कुटुंबियांना औरंगाबाद मध्ये बोलवून घेतले. कुंभेफळ येथील मंदिरामध्ये नवरदेव व त्याचे कुटुंबीय आले. त्याच सोबत वधू व तिचे बनावट आई-वडील त्याच सोबत बनावट वराडी मंडळी देखील त्या ठिकाणी उपस्थित झाले. नवरदेव गणेश पवार यांच्या भावाकडून सविता माळी या गुन्ह्यातील सूत्रधाराने दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर गणेश व अर्चनाचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर सविता व तिचे साथीदार वेगवेगळे बहाने सांगून पोबारा झाले.

नवरदेव व कुटुंबीय वधूसह चार चाकी मधून घरी येत असताना त्यांना वधूने रस्त्यामध्ये गाडी थांबवायला सांगितली. तिनेदेखील रस्त्यामध्ये गाडी थांबवायला लावून पळ काढला. आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले. या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी ते तेथील स्थानिक पोलिस स्टेशनला गेले व गुन्हा दाखल केला. मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सुनील चव्हाण, त्याचबरोबर त्यांचे साथीदार बाबासाहेब कांबळे, विलास मुठ्ठे, मनोहर गीते व महिला कर्मचारी कुंडकर या सगळ्यांनी  तपासाला सुरुवात केली. तपासाचे काम रात्रभर चालवून आरोपींना पकडले. सविता माळी व तिचे साथीदार अर्चना ढाकणे, पूजा राजपूत व अन्य एकास पोलिसांनी अटक केली.

चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत आपण अशा प्रकारच्या १०  विवाहमधून तरुणांना फसवल्याचे आरोपींनी उघड केले. लग्न न होत असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याकडून अशाच प्रकारे पैसे व सोने लूटत असल्याचे देखील त्यांनी कबूल केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.