दोन वयोवृद्धांवर लांडग्यांचा जीवघेणा हल्ला!
जनावरे,शेळ्या,मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघाजणांवर लांडग्यांनी जिवघेणा हल्ला केल्याची,दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्यातील बेनापुर गावाजवळ घडली असल्याची माहिती आहे.
हल्ला झालेल्या दोघांची नावे दिनकर शिंदे आणि विठ्ठल शिंदे अशी असून दोघेही वयोवृद्ध होते. हे दोघेही सांगली जिल्ह्यातील बेनापुर या गावचे रहिवासी आहेत.
हे दोघेही नेहमीप्रमाणे शेजारच्या डोंगरावर आपली जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. अचानकपणे या दोघांना तीन लांडग्यांनी घेतले. लांडग्यांनी घेरल्यानंतर या दोघांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परंतु तोपर्यंत लांडग्यांनी यांच्यावर हल्ला केला. आणि या दोघांच्या शरीराच्या अनेक भागांवर लचके काढले.
स्वतःच्या जिवाला घाबरून या दोघांनी अधिक प्रतिकार केल्यावर लांडगे पळून गेले. स्थानिकांनी या दोघांना तात्काळ रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर फार घाबरण्याची गरज नसल्याचं नातेवाईकांना सांगितलं.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम