खडसे यांच्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार?

0

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहेत मात्र हा भाजपसाठी फार मोठा धक्का आहे कारण मास लीडर व ओबीसींचा चेहरा असलेले खडसे यापुढे भाजपचेच अडचणी वाढतील. खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मधील प्रवेश हा भविष्यातील राजकीय समीकरण ठरवणारा निर्णय आहे. करण खडसे यांच्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा बदल घडणार आहे.


उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मधील समीकरणे बदलणार आहेत. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधील शीतयुद्ध हे काही जुने नाही.

2014 साली भाजपाने महाराष्ट्र मध्ये सरकार स्थापन केले व एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून डावलले तेव्हापासूनच एकनाथ खडसे व देवेंद्र फडणवीस हे शीतयुद्ध चालू झाले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्यामुळे खडसे यांचे मुख्य विरोधक हे देवेंद्र फडणवीस असतील. त्यामुळे यापुढे खडसे व देवेंद्र फडणवीस यांच्या मधील शाब्दिकवाद हा होतच राहणार. फडणीस यांच्यावरील टीकेमुळे फडणवीस अडचणीत येतील व याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होईल.

जळगाव जिल्ह्यात देखील गिरीश महाजन यांना फटका बसेल. करण खडसे यांच्या राजकीय प्रवेशामुळे भाजपला जळगाव जिल्ह्यामध्ये फार मोठा झटका सहन करावा लागणार आहे. खडसे हे सत्तेत गेल्यामुळे त्यांच्यासोबत अनेक आमदार येण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव मधल्या बहुजन मतदारांवर  देखील याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला व महा विकास आघाडीला हक्काचा माणूस मिळाला आहे. खडसे यांचा उपयोग भारतीय जनता पार्टीला जेरीस आणण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. ओबीसी चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख महाराष्ट्रभर आहे आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्की होईल. खडसे हे ओबीसी नेते असल्यामुळे महाराष्ट्रभर ओबीसी समाज खडसे यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद महानगरपालिका आणि स्थानिक निवडणुका यांवर देखील भाजपला या पुढे परिणाम पहायला मिळेल. जिल्हा बँक व दूध संघ यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खडसे यांचा फायदा होईल.

यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणतात “छोट्यात छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो कोणी ज्यावेळेस पक्षातून जाते त्यावेळेस पक्षाचा काही ना काही तोटा होत असतो. परंतु भारतीय जनता पार्टी हा पक्ष फार मोठा आहे त्यामुळे त्यामुळे कोणाच्या येण्यामुळे थांबला नाही व कोणाच्या जाण्यामुळे पक्ष थांबला नाही.  जळगाव जिल्हा हा भाजपचा जिल्हा आहे, हा मूळ भाजप विचाराचा जिल्हा आहे.   त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहील.”

खडसे यांना मंत्रीपदावरून काढणे, खडसे यांचे विधानसभा तिकीट कापणे, पक्ष कार्यकारणी मधून खडसे यांना डावलणे हेच भाजपला महागात पडले. अभय पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.