धर्मपुरी येथून १९ वर्षीय तरूण बेपत्ता!
माळशिरस तालुक्यातील धर्मापुरी या गावामधील 19 वर्षीय तरुण काल दुपारी बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव ऋतिक गायकवाड असून तो धर्मपुरी येथून दुपारी बाराच्या सुमारास फलटण येथे ॲडमिशन घेण्यासाठी म्हणून निघाला होता. धर्मपुरी एसटी स्टॅन्ड वरून तो एका अज्ञात चार चाकीमध्ये गेला. अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
बेपत्ता तरुण ऋतिक गायकवाड हा मालोजीराजे एग्रीकल्चर कॉलेज फलटण येथे तिसऱ्या वर्षाचं ऍडमिशन घेण्यासाठी निघाला होता. दुपारचे चार वाजले तरी ऋतिक हा घरी आला नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी तपास सुरू केला.
ऋतिक बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. अशी माहिती ऋतिकच्या नातेवाईकांनी दिली.
*** यासंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा; ७२१९३५५६१४/७२१९५१३८८३
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम