नोकरी गेली म्हणून खचल्या नाहीत चालू केला स्वतःचा व्यवसाय.

0

 
लॉकडाऊन  मध्ये नोकरी गेली म्हणून न खचता व अन्य कोणाला दोष न देता सुषमा पटेल आणि अमृता शिगवण या दोघींनी स्वतःचा व्यवसाय चालू केला.  आपण घेतलेल्या शिक्षणाचा मोठेपणा माणसाने बाजून जर ठेवला तर खरंच मराठी माणसाला पुढे जायला खूप वाव आहे. काम कुठलेही असेना ज्यांना आपल्या कामाची लाज वाटत नाही ते नक्की यशस्वी होत असतात.


वरील फोटो हा गिरगाव मधील आहे. या दोघी सकाळी ६ ते ९ या वेळेत इडली विकतात. त्याचसोबत त्या गरमागरम पोहे देखील विकतात. या दोघी कधीच या गोष्टीचे दुःख करत बसल्या नाहीत की आमची नोकरी गेली. या दोघीवर कुटुंबाची जबाबदारी आहे. आज खरंच मराठी माणसाने अशा छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळायला हवे. कारण नोकरी नाही म्हणून दुखः करत बसण्यात काहीच अर्थ नाही.


छ्त्रपती शिवाजी महाराज देखील नेहमी म्हणायचे छोटेसे का होईना पण स्वतः चे साम्राज्य असावे. चहाची टपरी का असेना, परंतु त्याचे मालक तुम्ही स्वतः असता. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांनीदेखील खचून न जाता वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गांचा अवलंब करून व्यवसायात उतरावे. आपल्या नोकरी गेल्याचे दुःख करत बसून वेळ वाया घालवू नये.


नोकरी ही सुरक्षित असते, हा गोड गैरसमज लोकांच्या मनात आहे आणि नोकरीला सर्वस्व मानत असतात.आज बाहेरून लोक येऊन या ठिकाणी व्यवसाय करत आहेत आणि आपण मात्र नोकरी नाही म्हणून बसलो आहोत.व्यवसायाकडे देखील सकारात्मकतेने पाहा. कुठल्याही गोष्टीची सुरुवात खूप छोटी असते परंतु तिला मूर्त आणि मोठे रूप द्यायचे आपल्या हातांमध्ये असते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.