शेतकऱ्यांना खरंच मदत मिळणार का?
पावसामुळे शेतकरी बांधवांचे आतोनात हाल झालेले आहेत. कधी दुष्काळाने होरपळत असतो, कधी त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही तर कधी हा पाऊस त्याला व्यवस्थित जगू देत नाही. शेतकऱ्याने किती संकटांना तोंड द्यावे ह्याला काही मर्यादा नाहीत.
त्यातल्या त्यात उस्मानाबाद जिल्हा नेहमी दुष्काळाच्या संकटावर मात करत पुढे जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मात्र या पावसामुळे पुरते हैराण झाले आहेत. आधी लॉकडाऊनमुळे जे होते नव्हते ते सर्व गमावले. त्यामध्ये शेती कशीबशी पिकवली तर हाता तोंडाला आलेले पीक गमवावे लागले. किती यातना इथल्या शेतकऱ्याने सहन कराव्या.
सर्व नेतेमंडळी बांधावर जाऊन गाठीभेटी घेत आहेत. अगदी सत्ताधारी विरोधक सर्वांचे दौरे शेतकऱ्याच्या बांधावर होत आहेत. अगदी बरेच स्थानिक नेते देखील शेतकऱ्यांचे सत्वन करत आहेत, चांगली गोष्ट आहेत. परंतु शेतकऱ्याला मदतीची गरज आहे सांत्वना ची नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला लोकांचे उसने घेतलेले पैसे द्यायचे आहेत, सावकाराची देणी द्यायची आहेत. त्याला त्याच्या मुलांच्या शिक्षणाची फी भरायची आहे. तो संपूर्णपणे हताश झाला आहे.
एकतर शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शेतकरी बांधवांना सर्व गोष्टींना तोंडावर पट्टी बांधल्या सारखे निमुटपणे सर्व सहन करावे लागत आहे. कारण आजपर्यंत शेतकऱ्याचा वापर हा फक्त राजकारण करण्यासाठीच झाला आहे.
सरकारने जाहीर केली आहे. आता पुढे हे पाहणे ऑस्तुक्याचे असणार आहे की फक्त दौरे होणार आहेत का शेतकऱ्यांना खरंच मदत मिळते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम