Soap for face : तुम्ही देखील चेहऱ्याला साबण लावता? मग हे वाचा आणि तुम्हीच ठरवा काय ते..

0

Soap for face : प्रत्येकाला आपण इतरांपेक्षा चांगलं दिसावं, असं वाटतं असतं. आपला चेहरा इतरांपेक्षा चमकदार आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण प्रयत्न देखील करतात. साहजिक यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकजण चेहऱ्याची विशेष काळजी देखील घेतात. मात्र तुमच्यापैकी अनेकजण असे आहेत, जे अंघोळ करताना चेहऱ्याला साबण देखील लावतात. आता तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले असेल. मात्र साबण चेहऱ्यासाठी प्रचंड धोकादायक आहे. जाणून घेऊया अधिक..

साबण फक्त चेहऱ्यालाच नाही, तर शरीरासाठी देखील घातक आहे. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. साबणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल्स असते. चेहरा खूप नाजूक अवयव आहे. त्यामुळे चेहऱ्यावर साबण लावल्याने चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खराब होते. साबणामध्ये कृतीम सुगंध, सोडियम या सारखे अनेक हानिकारक घटक असतात. ज्यामुळे स्कीन इन्फेक्शन देखील होण्याची दाट शक्यता असते.

तुम्ही घरी घेऊन येत असलेला साबण व्यवस्थित पहिला तर त्यावर टॉयलेट सोप असं लिहिलेलं पाहायला मिळाले. आता यावरून तुमच्या लक्षात आले असेल, टॉयलेट नंतर हात धुण्यासाठी वापरण्याचा साबण आपण शरीर आणि चेहऱ्याला लावतो. ज्या साबणावर TFM 76% टक्क्यांपेक्षा अधिक आहे. केवळ तोच साबण शरीरासाठी वापरण्याचा आहे. हे लक्षात घ्या. जो साबण शरीरासाठी वापरत नाहीत, तो आपण चेहऱ्याला लावतो.

जर तुम्ही देखील चेहऱ्याला साबण लावून चेहरा खराब करत असाल त्वरित थांबवा. चेहरा साबणाने धुण्याची काहीही आवश्यकता नाही. जर तुम्ही दिवसातून चार पाच वेळा केवळ पाण्याचे चेहरा धुवला तरीदेखील चेहऱ्याची चमक तुम्हाला वाढल्याचा अनुभव येईल. साबण ऐवजी तुम्ही फेस वॉशचाही वापर करू शकता. चेहऱ्यावर अधिक चमक हवी, असेल तर तुम्ही हळद देखील लावू शकता.

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही तणावमुक्त असणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर चमक केवळ बाहेरून उपाययोजना करून काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी तुम्ही आनंदी असणे फार आवश्यक आहे. याशिवाय दिवसातून तुम्ही पाच, सहा लिटर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. आहारात हेल्दी फूडचा समावेश देखील महत्वाचा आहे. जंक फूडचे सेवन तुम्ही अधिक प्रमाणात करत असाल, तर चेहऱ्याचे सौंदर्य खुंटू शकते. जंक फूडमुळे चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी जमा होते.

हे देखील वाचा  Eye Care Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी 20-20-20 फॉर्म्युला लागलीच फॉलो करा; होय अन्यथा येईल अंधत्व..

Virat Kohli Son Citizenship : विराट कोहलीचा मुलगा अकाय कोहली होणार इंग्लंडचा नागरिक? हा आहे इंग्लंडच्या नागरिकत्वचा नियम..

Love tips : मुलगी तुमच्यावर फिदा असल्यावर देते हे चार इशारे..

Ishan Kishan Shreyas Iyer : BCCI ने श्रेयस अय्यर ईशान, किशनला करारातून वगळले; एक वर्ष संधीही नाही, निर्णयाची अंमलबजावणी बाकी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.