राष्ट्रवादी विश्वासराव नाना देवकाते यांना नवीन जबाबदारी देणार? पुणे
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते नाना देवकाते पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते बारामती व महाराष्ट्र भर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना बारामती व महाराष्ट्रात मानणारा वर्ग हा खूप मोठा आहे. स्वतःची वेगळी ओळख त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर बनवली आहे. धनगर समाज व ओबीसी मध्ये देखील नाना देवकाते यांना मानणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विश्वासराव देवकाते यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदाची उमेदवारी द्यायला सकारात्मक आहे. तशी मागणी देखील त्यांचे कार्यकर्ते वारंवार करत असल्याचे बोलले देखील जात आहे.नाना देवकाते हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेली कुठलीही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असतात. विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा असेल देवकाते प्रचारामध्ये सक्रिय होऊन होम टू होम प्रचार करत असतात.
बारामतीच्या राजकारणामध्ये देवकाते यांचा खूप मोलाचं वाटा आहे. त्यांना मानणारा वर्गदेखील खूप मोठा आहे. त्यामुळे देवकाते यांना राज्यपाल नियुक्त उमेदवार जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत बोलणी देखील झाल्याची चर्चा आहे. नाना देवकाते यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर नाना देवकाते नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे व पुढील राजकारणावर देखील याचा परिणाम होऊ शकतो.
विश्वासराव देवकाते यांनी आपल्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष पद असताना त्यांनी सर्वसामान्यांची कामे मार्गी लावून ग्रामीण भागात नवनवीन योजना राबवल्या आहेत. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर कटाक्षाने लक्ष देऊन ते सोडवण्याचे काम ते नेहमी करत असतात.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम