ENG vs IND 3rd test : 445 धावा करूनही इंग्लंड ड्रायव्हिंग सीटवर; ..तर सामना वाचवणं भारतासाठी अवघड..

0

ENG vs IND 3rd test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test series) यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी दमदार कमबॅक केलं असून, इंग्लंड ड्रायव्हिंग सीटवर आला आहे. पहिल्या डावात 445 धावा करूनही, भारतीय संघ तिसरा कसोटी सामना पराभूत होतो, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्यापही भारताकडे 153 धावांची बढत असली तरी इंग्लंड पहिल्या डावात आघाडी घेण्याची दाट शक्यता दिसत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेली पाच कसोटी सामन्याची मालिका आता रंगतदार अवस्थेत आली आहे. दोन्ही संघाने एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जो संघ तिसरा कसोटी सामना जिंकेल, त्या संघाला मालिका जिंकण्याची अधिक संधी असणार आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 445 धावांचा डोंगर उभा आल्यानंतरही इंग्लंडने दमदार कमबॅक केला आहे.

जर इंग्लंड संघाने पहिल्या डावात भारताच्या धावसंख्येची बरोबरी केली, तर भारतीय संघाला तिसरा कसोटी सामना वाचवणे आव्हानात्मक असणार आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी स्पिन गोलंदाजाला साथ देणार असल्याने, इंग्लंडचा संघ भारतावर वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. चौथ्या आणि पाचव्या दिवशी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (ravichandran Ashwin) प्रचंड घातक ठरतो. मात्र परिवाराच्या अडचणीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या उर्वरित खेळातून तो बाहेर झाला आहे.

तिसरा कसोटी सामन्यात यापुढे रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करताना दिसणार नाही. साहजिकच त्यामुळे भारताच्या गोलंदाजीची सगळी मदार कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) या दोन स्पिनरवर येऊन ठेपली आहे. यापुढे खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना मदत करणारी आहे. असं असलं तरी अश्विन गोलंदाजी करणार नाही. ज्याचा फायदा इंग्लंडच्या संघाला होणार आहे.

जर पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने भारताच्या डावाच्या धावसंख्येची बरोबरी केली तर भारतीय संघाला तिसरा कसोटी सामना वाचवणे अवघड जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे, भारतीय संघ चौथ्या दिवशी फलंदाजी करणार आहे. चौथ्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय संघाने जर 200 धावांच्या आसपास इंग्लंड संघाला आव्हान दिले, तर इंग्लंडचा संघ चेस करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हे देखील वाचा Manoj jarange Maratha Reservation : मुंबईत जाऊन गुलाल उधळला, मग आता उपोषण का करतायत जरांगे पाटील? वाचा सविस्तर..

Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

Wedding : निमंत्रणाशिवाय लग्नात जेवणं हा गंभीर गुन्हा! तब्बल इतक्या वर्षांच्या शिक्षेची तरतूद; जाणून घ्या कायदा..

Kitchen Hacks : सावधान..! तुमचाही गॅस बर्नर कमी चालतो? आजच चेक करा या गोष्टी अन्यथा..

Sarfaraz Khan Debut : रन आउटवर सरफराज खानच्या वडिलांची प्रतिक्रीया समोर आल्यानंतर जडेजानेही मागितली माफी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.