Wedding : निमंत्रणाशिवाय लग्नात जेवणं हा गंभीर गुन्हा! तब्बल इतक्या वर्षांच्या शिक्षेची तरतूद; जाणून घ्या कायदा..

0

Wedding : सध्या लग्नाचा (wedding season) सिझन सुरू आहे. या दिवसात आपल्या आसपास, कामाच्या ठिकाणी अनेक लग्न सोहळे पार पडताना पाहायला मिळतात. साहजिकच त्यामुळे अनेक जण निमंत्रण नसताना देखील जवळ लग्न असेल तर जेवण करण्यासाठी जातातही. जर तुम्ही देखील अशा विचारात असाल, तर सावधान! निमंत्रणाशिवाय लग्नात जेवण करणं, हा गंभीर गुन्हा आहे. तुमच्या या कृत्यामुळे तुम्हाला जेलवारी होऊ शकते.

निमंत्रण शिवाय लग्नात जेवण हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये या संदर्भात एक मोठी घटना घडली आहे. निमंत्रणाशिवाय एखाद्या कार्यक्रमात जेवण करणे, हा खूप साधा विषय असला तरी कायद्यामध्ये या प्रकाराला गंभीर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र हे अगदी खरं आहे.

गेल्या महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये दोन तरुण निमंत्रणाशिवाय लग्नात घुसले. पोटभर जेवणही केलं, इतकच नाही, तर वरातीत डान्स देखील केला, अर्थात डान्स केल्यामुळे पाहुण्यांच्या तरुण नजरेस आले. पाहुण्यांनी एकमेकांना विचारपूस करून हे तरुण कोण आहेत, याची चौकशी केली. नवरी आणि नवरदेव दोन्ही कडून दोघांनाही निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे पाहुण्यांनी पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यात दिले.

काय आहे कायदा

कोणत्याही कार्यक्रमात जर तुम्ही निमंत्रणाशिवाय जेवायला गेला तर हा गंभीर गुन्हा आहे. भारतीय दंड विधान कलम 442 आणि 452 (IPC section 442 and 452) या अंतर्गत तुमच्यावर गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे. या दोन कलमांतर्गत जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, तर दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमात निमंत्रणाशिवाय जेवायला किंवा कोणाच्याही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये निमंत्रण नसताना गेला, तर हा ट्रेसपासिंगचा प्रकार असल्याचं म्हंटले आहे.

निमंत्रण शिवाय एखाद्या कार्यक्रमांमध्ये जेवायला जाणं हा प्रकार बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत अनेकदा घडतो. होस्टेलवर राहणाऱ्या मुलांना मेसचे जेवण करून कंटाळा येणे स्वभाविक आहे. साहजिकच त्यामुळे जवळपास असणाऱ्या एखाद्या कार्यक्रमात अनेक तरुण घुसून जेवण करताना पाहायला मिळतात. मात्र हा गंभीर गुन्हा असून, अनेकांनी या संदर्भात सतर्क राहणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Kitchen Hacks : सावधान..! तुमचाही गॅस बर्नर कमी चालतो? आजच चेक करा या गोष्टी अन्यथा..

Sarfaraz Khan Debut : रन आउटवर सरफराज खानच्या वडिलांची प्रतिक्रीया समोर आल्यानंतर जडेजानेही मागितली माफी..

Virat Kohli T20 World Cup : विराट कोहली सोबत षडयंत्र? रोहित T20 संघात; मग विराट कोहली का नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.