Rahul Dravid vs Ishan Kishan: ..म्हणून आयपीएल चांगले गेले तरी संधी नाही! द्रविड, रोहीत नंतर BCCI चाही किशनला इशारा; जाणून घ्या नाराजीचे कारण..
Rahul Dravid vs Ishan Kishan : भारतीय क्रिकेटपासून ईशान किशन (ishan Kishan) सध्या दूर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील चांगली कामगिरी केल्यानंतरही ईशान किशनला (ishan Kishan) भारतीय संघापासून दूर ठेवण्यात आलं आहे. सुरुवातीला ईशान किशनला विश्रांती देण्यात आल्याची माहिती होती. आता मात्र ईशान किशन डच्चू देण्यात आला असून, बीसीसीआय (BCCI) देखील ईशानवर नाराज असल्याची माहिती आहे.
ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेतली होती. मानसिक थकव्याचे कारण देत ईशान किशनने BCCI कडे विश्रांती मागितली होती. BCCI ने ईशान किशनची मागणी मान्य केली. मात्र मानसिक थकव्याचे कारण देत ईशान किशन दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. या प्रकारामुळे बीसीसीआयने ईशानवर शिस्तभंगाची कारवाई केल्याची माहिती आहे.
केएस भरत (ks Bharat) सातत्याने अपयशी ठरत असताना देखील ईशान किशनची कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून, निवड न करणे हा त्याचाच परिणाम असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर ईशान किशनला भारतीय संघात कमबॅक करायचं असेल, तर डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागेल असा देखील सल्ला त्याला देण्यात आला. मात्र राहुल द्रविडने (Rahul Dravid) दिलेला सल्ला ईशान किशनने धुडकावून लावला. त्यामूळे बीसीसीआय देखील ईशानवर प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
कोच राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंट यांनी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी ईशान किशनला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ईशानने राहुल द्रविड यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबत अहमदाबादमध्ये सराव करताना पाहायला मिळाला. साहजिकच त्यामुळे बीसीसीआय देखील ईशान किशनवर नाराज आहे.
सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार, आयपीएलच्या कामगिरीवर ईशान किशनला भारतीय संघात संधी दिली जाणार नसल्याचं त्याला कळवण्यात आले आहे. यापुढे भारतीय क्रिकेटमध्ये संधी हवी असल्यास, खेळाडूंनी डोमेस्टिक क्रिकेटकडे लक्ष द्यावे. यापुढे केवळ आयपीएल कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात संधी दिली जाणार नाही. डोमेस्टिक क्रिकेटच्या कामगिरीवरच यापुढे भारतीय संघात खेळाडूची निवड केली जाणार असल्याचे BCCI कडून खेळाडूंना सूचित करण्यात आल्याचीही माहिती आहे.
हे देखील वाचा BCCI On Virat Kohli: विराटच्या फॅमिली फर्स्टच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचेही दमदार उत्तर..
IND vs ENG Rajkot test: सरफराज खान खेळणार का? जाणून घ्या राजकोट कसोटीसाठीची भारतीय प्लेइंग11..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम