विरोधक बिहारमध्ये; शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पवार साहेबच: मुंडे
परतीच्या पावसाने महाराष्ट्रामधील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतामधील उभी पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी भागांची जिल्हाधिकार्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आज मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी केली. राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करेल परंतु सर्वतोपरी मदत राज्य शासन करू शकत नाही. केंद्राने मदत करणे गरजेचे आहे. असे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दुसरीकडे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देऊ. असे त्यांनी आश्वासन दिले.
माध्यमांनी काही विचारलेल्या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पवार साहेब आणि राष्ट्रवादीच सर्वप्रथम येते. विरोधक सध्या बिहार निवडणुकीत व्यस्त आहेत. निवडणुका आल्या की बीजेपी वाल्यांना काहीही दिसत नाही. असा टोला धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांशी बोलताना लगावला.
देवेंद्र फडणवीस सध्या बिहार निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. आणि यामुळेच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
आपण एखाद्या शेतकऱ्यांवर आन्याय होतो तेंव्हा आपण शेतकऱ्यांची बातमी नाही तर जाहिरात का नाही देत