Rahul Dravid On Virat kohli: विराट खेळणार का की नाही? राहुल द्रविडने थेट सांगितले..

0

Rahul Dravid On Virat kohli: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकून मालिकेत बरोबर साधली आहे. भारतीय संघ पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडवर वर्चस्व प्रस्थापित करेल असं बोललं जात होतं. मात्र इंग्लंड संघाने दमदार खेळ सादर करत, भारतीय संघाला कडवे आव्हान दिले आहे. मालिका बरोबरीत असल्यामुळे आता उर्वरित तीन कसोटी सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. इंग्लडही दमदार खेळाचं प्रदर्शन करत असल्याने, मालिकेचा निकाल काहीही लागण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याला 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. शेवटच्या तीन कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची निवड देखील केली जाणार आहे. पहिल्या दोन कसोटीतून विराट कोहलीने (Virat kohli) माघार घेतली होती. तिसरा कसोटी सामना विराट कोहली खेळणार की नाही, याविषयी देखील अजूनही मोठी संभ्रमता आहे. मात्र सामन्यानंतर काल पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने (Rahul Dravid) देखील याविषयी भाष्य केलं आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली नसल्याने त्याची उणीव भारतीय संघाला भासली होती. विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये असल्याने, विराट कोहलीची मोठी कमतरता भारतीय संघाला भासत आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना आक्रमक खेळ या दोन्ही गोष्टी विराट कोहलीच्या जमेच्या बाजू आहेत. विराट कोहलीचा मोठा फॅनबेस देखील आहे. त्यामुळे चाहते विराट कोहलीला मैदानावर पाहणं पसंत करतात. साहजिक या सगळ्यांमुळे विराट खेळणार की नाही? याची जोरदार चर्चा सूरू आहे.

विराट कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, यावेळी विषयी मोठी संभ्रमता आहे. अशातच काल दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर, पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने पत्रकारांशी संवाद साधला. (Rahul Dravid press conference) विराट कोहली खेळणार की नाही, असा थेट प्रश्न राहुल द्रविडला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल द्रविडनेही विराट कोहली संदर्भात सस्पेन्स कायम ठेवला.

विराट कोहली खेळणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल म्हणाला, हा प्रश्न तुम्ही निवड समितीला विचारा. निवड समिती आम्हाला जो संघ देते, त्या संघासोबत आम्ही खेळत असतो असं राहून द्रविडने म्हटले. राहूल द्रविडच्या उत्तरामुळे आता विराट कोहलीचे चाहते निराश झाले आहेत. राहुल द्रविडच्या उत्तरामुळे प्रत्यक्ष विराट कोहली खेळणार नसल्याचंच स्पष्ट होत आहे. जरी राहुल द्रविडने विराट कोहलीच्या खेळण्याविषयी स्पष्टता केली नसती तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उपलब्ध आहे.

हे देखील वाचा England team leaves India : दुसऱ्या कसोटीनंतर या कारणामुळे इंग्लंडने सोडला भारत; कारण जाणून तुम्हीही..

IND Squad For Last 3 Tests vs ENG : या तीन खेळाडूंच्या निवडीवर मैदानातच गंभीर चर्चा; रोहीत शर्मा, राहुल द्रविड, आगरकर यांचा प्लॅन समोर..

physical relationship tips: आठवड्यातून किती वेळा संबंध ठेवणे मानले जाते योग्य; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.