IND Squad For Last 3 Tests vs ENG : या तीन खेळाडूंच्या निवडीवर मैदानातच गंभीर चर्चा; रोहीत शर्मा, राहुल द्रविड, आगरकर यांचा प्लॅन समोर..

0

IND Squad For Last 3 Tests vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test series) यांच्यामध्ये सुरू असलेली पाच कसोटी सामन्याची मालिका आता रंगतदार अवस्थेत आली आहे. इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. भारतीय संघ इंग्लंडला व्हाइट वॉश देईल असं देखील बोललं जात होतं. मात्र इंग्लंड संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत, भारतीय संघाला घाम फोडला. सहाजिकच त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

आज भारतीय संघाची इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी निवड केली जाणार आहे. आज अधिकृतरित्या भारतीय संघाची निवड केली जाणार असली तरी दुसरा कसोटी सामना संपल्या नंतर थेट मैदानातच रोहित शर्मा (Rohit Sharma) राहुल द्रविड (Rahul Dravid) समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit agarkar) यांच्यामध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. कोच, कॅप्टन आणि निवड समितीचे अध्यक्ष यामध्ये ऑन कॅमेरा मैदानात चर्चा होणारी पहिलीच वेळ असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरताना पाहायला मिळाले. दोन्ही कसोटीमध्ये काही खेळाडूंच्या व्यक्तीगत कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ या दोन्ही सामन्यात ठीकठाक कामगिरी करू शकला. यामध्ये केएल राहुल (kl Rahul) रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यशस्वी जयस्वाल (yashaswi jaiswal) आणि शुभमन गिल (shubman gill) या फलंदाजाचा समावेश आहे. भारताच्या फलंदाजांकडून भागीदारी आणि सांघिक खेळ पाहायला मिळाला नसल्याने, फलंदाजीक्रमात मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती आहे.

मैदानामध्ये कॅप्टन रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यामध्ये काही खेळाडूचा निवडीविषयी दीर्घकाळ चर्चा देखील झाली आहे. केएल राहुलचे (kl Rahul) कमबॅक निश्चित मानलं जात असून, इशान किशनच्या निवडीवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. विकेटकीपर केएस (ks Bharat) भरतला डच्चू देण्यात येणार असून, त्याच्या जागी ईशान किशनची (ishan Kishan) निवड केली जाऊ शकते. तिघांमध्ये यावर चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.

केएस भरतने विकेट कीपिंग चांगली केली असती तरी फलंदाज म्हणून तो सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर ईशान किसानची निवड केली जाऊ शकते सामान्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने याचे संकेत देखील दिले आहेत. किशन किशनवर प्रश्न विचारल्यानंतर, राहुल द्रविड म्हणाले, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.

ईशान किशन नंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. श्रेयस अय्यरला बाहेर केलं जाणार असून, त्याच्या जागी सरफराज खानला (sarfaraaz khan) संधी देण्यावर चर्चा झाली. केएस भरतच्या जागेवर ईशान किशन तर रजत पाटीदारच्या जागेवर केएल राहुल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीच्या उपस्थितीवर देखील चर्चा झाली असून, तो तिसरा सामना खेळण्यासाठी अवेलेबल असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा  india squad for 3rd test : तिसऱ्या कसोटीत होणार हे आश्चर्यकारक बदल; या खेळाडूच्या जागी सरफराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी..

physical relationship tips: आठवड्यातून किती वेळा संबंध ठेवणे मानले जाते योग्य; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर..

Acharya Chanakya on wife: बायकोपासून या चार गोष्टी लपवल्या तरच मिळेल सन्मान आणि नातं टिकेल दीर्घकाळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.