india squad for 3rd test : तिसऱ्या कसोटीत होणार हे आश्चर्यकारक बदल; या खेळाडूच्या जागी सरफराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी..

0

india squad for 3rd test : इंग्लंड आणि भारत (IND vs ENG test series) यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघाने एक-एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघात देखील अनेक बदल होणार असल्याने तिसऱ्या कसोटीकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठीच्या भारतीय संघाची आज निवड केली जाणार असून, अनेक आश्चर्यकार क निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. (India squad against England upcoming three test match) कसोटी सामना सुरू असताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit agarkar) यांनी मैदानामध्ये कॅप्टन रोहित शर्माची (Rohit Sharma) भेट घेतली. कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) सोबत देखील अजित आगरकर यांची चर्चा झाल्याने, अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.

मालिका सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारण देत माघार घेतली होती. विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय फलंदाजी आणि मैदानातील आक्रमकतेच्या बाबतीतही जाणवली. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार की नाही याविषयी देखील चर्चा मनात मोठी संभ्रमता असून, कोच राहुल द्रविडने देखील या संभ्रमतेत आणखी भर टाकली आहे.

दक्षिण आफ्रिका दौरा आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अपयशी ठरला. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल दोघांनाही बाहेर केला जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र योग्य वेळी शुभमन गिलने शतक झळकावले. त्यामुळे आपलं स्थान टिकवण्यात त्याला यश आले आहे. दुसरीकडे मात्र श्रेयस अय्यरला उर्वरित तीन कसोटी सामन्यातून बाहेर केलं जाणार असून, त्याच्या जागी सरफराज खानला (Sarfaraz Khan) संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी केएल राहुलचे (kl Rahul) देखील कमबॅक होणार आहे. रवींद्र जडेजाची (Ravindra jadeja) दुखापत मात्र गंभीर असल्याने, संपूर्ण मालिकेला रवींद्र जडेजा मुकणार आहे. श्रेयस अय्यरला मात्र डच्चू देण्यात येणार आहे. श्रेयस अय्यरच्या जागेवर स्पिन गोलंदाजांविरुद्ध दमदार खेळणाऱ्या आणि घरेलू क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा ओढणाऱ्या सरफराज खानला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात येणार आहे. यावर टीम मॅनेजमेंटचे देखील एकमत झाले आहे.

हे देखील वाचा physical relationship tips: आठवड्यातून किती वेळा संबंध ठेवणे मानले जाते योग्य; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर..

Acharya Chanakya on wife: बायकोपासून या चार गोष्टी लपवल्या तरच मिळेल सन्मान आणि नातं टिकेल दीर्घकाळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.