England team leaves India : दुसऱ्या कसोटीनंतर या कारणामुळे इंग्लंडने सोडला भारत; कारण जाणून तुम्हीही..
England team leaves India : पाच कसोटी सामन्याची मालिका रंगतदार अवस्थेत आली असतानाच, इंग्लंडने अचानक भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (England team decided leaves India after second test) दुसऱ्या कसोटी सामना भारतीय संघाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होता. पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकून पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ पिछाडीवर होता. मात्र दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने 105 धावांनी जिंकत मालिकेत बरोबर साधली आहे.
आता दुसरा कसोटी सामना पराभूत झाल्यानंतर, इंग्लंडच्या संघाने भारत सोडून अबु धाबीमध्ये (abu dhabi) जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना दुसऱ्या आणि तिसरी कसोटी दरम्यान मोठा ब्रेक मिळाला आहे. साहजिकच या कालावधीमध्ये इंग्लंडने आपल्या संघाला फ्रेश ठेवण्यासाठी एक योजना आखली आहे. ज्याचा भाग म्हणून, इंग्लंडचा संघ अबु धाबीमध्ये पोहोचणार आहे.
भारतीय वातावरणा जुळवून घेणे, इंग्लंडला नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे. सध्या इंग्लंड संघाचे खेळाडू आजारी देखील असल्याची माहिती आहे. अबु धाबीमध्ये इंग्लंडचा संघाने शिबिराचे आयोजन केले, असून यामध्ये खेळाडूंना फ्रेश ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. या कॅम्पमध्ये खेळाडू गोल्फ हा खेळ देखील खेळणार असल्याची माहिती आहे. इंग्लंडचा संघ नेहमीच खेळीमेळीच्या वातावरणात टाईम स्पेंड करणं पसंत करतो.
नवीन वातावरण आणि नवीन ठिकाणी गेल्यामुळे खेळाडू फ्रेश राहतील, हा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा समज आहे. भारतामध्ये येण्यापूर्वी देखील इंग्लंडचा संघ अबू धाबीमध्ये स्पिन गोलंदाजीचा सराव करत होता. आता पुन्हा एकदा दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडच्या संघाने अबु धाबीमध्ये सराव कॅम्प आयोजित केला असून, इंग्लंड उर्वरित सामन्याची तयारी तिथेच करणार आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी दोन दिवस अगोदर इंग्लंडचा संघ भारतात परतणार असल्याची माहिती आहे.
इंग्लंडने घेतलेल्या या निर्णयावर मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने (Michael Vaughan) टीका केली आहे. इंग्लंडच्या या निर्णयावर टीका करताना मायकेल वॉन म्हणाला, भारत हा सुंदर देश आहे. भारतामध्ये खूप सुंदर आणि चविष्ट पदार्थ खायला मिळतात. भारतामध्ये राहून आणखी या वातावरणाशी जुळवून घेता आलं असतं. इंग्लंड संघाने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे तो म्हणाला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम