Mumbai Customs Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; 63 हजार पगार, वाचा सविस्तर..

0

Mumbai Customs Recruitment 2024: देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने, अनेक जण दहावी बारावीनंतर कुठेतरी चार पैशाची नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी असून, या संदर्भात २० फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. जाणून घेऊया भरती प्रक्रिया विषयी सविस्तर माहिती..

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईकर या विभागामध्ये एकूण 28 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासंदर्भात अधीसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा असून, अर्जाची मुदत 20 फेब्रुवारी पर्यंत देण्यात आली आहे.

जागा आणि शैक्षणिक पात्रता

मुंबई कस्टम्स या विभागांमध्ये कर्मचारी कारचालक या पदासाठी 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराकडे मोटार कार ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे मोटार, कार चालवण्याचा तीन वर्ष अनुभव देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा/ परिक्षा फी/ पगार

मुंबई कस्टम्स या विभागात अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेची अट घालून देण्यात आली आहे. अर्ज करणारा उमेदवारा 18 ते 27 या दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना 19,000 ते 63 हजार दोनशे रुपयांपर्यंत दरमहा पगार दिला जाणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.

असा करा अर्ज

अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून अर्ज करण्याची मदत वीस फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता, Office of the Deputy Commissioner of Customs Q. Chief Commissioner of Customs. Custom House, Ballard Estate, Mumbai-400 001

मुंबई कस्टम्स विभागाची वेबसाईट पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा  Abdul Kalam on success Mantra: डॉ.अब्दुल कलाम यांचे चार गुरूमंत्र पाळा; अन्यथा संघर्ष, मेहनत करूनही मिळणार नाही यश..

Love tips: समोरून लाईन मिळते आहे, की नाही हे कसं ओळखाल? हे इशारे मिळत असतील, तर वेळ न घालवता बिंदास करा प्रपोज..

Rohit Sharma on retirement: सकाळी उठल्यावर माझ्या मनात..”निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं धडकी भरवणारं उत्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.