Women interest men: या पुरुषांची महिलांवर असते कायम जादू; महिलांना आवडणाऱ्या पुरुषांची यादी धक्कादायक..
Women interest in men: महिला (women) असो की पुरुष, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. अनेकदा असं सांगितलं जातं, नातेसंबंधांमध्ये पुरुष अधिक करून व्यक्त होतो. मात्र हे वास्तव नाही. महिलांना देखील स्वतंत्र विचार असतो. महिलाही आपल्या आवडीनुसार आपल्या पार्टनरची निवड करतात. महिलांना कशा प्रकारचे पुरुष (men) आवडतात, याविषयी एक सर्वे करण्यात आला. ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या.
महिला आपल्याविषयी काय विचार करतात, महिलांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात, हा प्रश्न असंख्य जणाला पडतो. महिलांना पुरुषांमधील कोणते गुण आवडतात? याविषयी अनेकांना जाणून घेण्यामध्ये उत्सुकता देखील असते. महिलांना पुरुषांमधील काय आवडतं, याविषयी अमेरिकेत एक सर्वे करण्यात आला जाणून घेऊया याविषयी सविस्तर..
महिला आपला जोडीदार निवडताना केवळ संपत्तीचा विचार करतात, असं अनेकदा बोललं जातं. मात्र हे वास्तव नाही. आपला जोडीदार हा स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असावा, असं अनेकांना वाटतं. मात्र याबरोबरच तो मुक्त विचाराचा असायला हवा. पुरुषांमध्ये रॉयल्टी असायला हवी. असे प्रत्येक महिलेला वाटते. आपल्या नात्याविषयी जर तो प्रामाणिक नसेल, तर महिलांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. अशी माहिती समोर अली आहे.
ज्या पुरुषांमध्ये आपल्या जोडीदारा विषयी निष्ठा असते, अशा पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात. आपला जोडीदार निवडताना महिला पुरुषांचा लुकही लक्षात घेतात. मात्र यापेक्षा जास्त महिला आपल्या जोडीदारामध्ये दयाळपणा आहे का? आपला जोडीदार सहनशील आहे का? या गोष्टी विचारत घेऊनच जोडीदार निवडत असल्याचं समोर आले आहे.
असं सांगितलं जातं, नात्यात प्रेम एकवेळ नसेल तरी देखील हरकत नाही. मात्र नात्यांमध्ये एकमेकांविषयी आदर फार महत्त्वाचा आहे. दोघेही एकमेकांचा रिस्पेक्ट करत नसतील, एकमेकांचा सन्मान करत नसतील, तर नातं फार काळ टिकत नाही. आपला जोडीदार आपल्यावर किती प्रेम करतो, यापेक्षा जोडीदार आपला सन्मान किती करतो, यावर नातं टिकून असतं. महिला देखील हाच विचार करून आपला जोडीदार निवडत असल्याचे सर्वेतून समोर आलं आहे.
जोडीदार निवडताना महिलाआर्थिक स्थिरतेला महत्व देत असल्या तरी कुटुंबासाठी वचनबद्ध असणारा जोडीदार निवडणे अधिक पसंत करतात. कुटुंबाला महत्व देणारा जोडीदार असावा, असं महिलांना नेहमी वाटतं. आपल्या जोडीदारामध्ये विश्वासाहर्ता आणि विवेकबुद्धी असणाऱ्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होत असल्याचं सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..
IND vs ENG 1St test: राम मंदिर उद्घाटनाकडे पाठ फिरवताच, विराट कोहली कसोटीतून आउट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम