IND vs ENG 1St test: राम मंदिर उद्घाटनाकडे पाठ फिरवताच, विराट कोहली कसोटीतून आउट..

0

IND vs ENG 1St test: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने इंग्लंड विरुद्ध होणारी कसोटी मालिका (India vs England test series) भारतीय संघासाठी प्रचंड महत्वपूर्ण मानली जात आहे. पाच कसोटी सामन्याची मालिका असल्याने, या मालिकेकडे अनेकांचं लक्ष आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या दोघांच्या अनुपस्थितीत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असल्याने, भारतीय फलंदाजासाठी आव्हानात्मक परिस्थिती देखील असणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय मधली फळी अक्षरशः कोलमडताना पाहायला मिळाली होती. केवळ मधली फळीच नाही, तर सलामीवीर देखील अपयशी ठरले होते. भारतीय खेळपट्टी मात्र जलदगती गोलंदाजांसाठी फारशी अनुकूल नसणार आहे. त्यामुळे फलंदाजीमध्ये भारतीय संघाला फारशी अडचण येणार नाही. असं असलं तरी आता भारतीय संघाला विराट कोहलीच्या (Virat kohli) रूपात मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात विराट कोहली वगळता भारताचा एकही फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करताना पाहायला मिळाला नव्हता. मात्र आता विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर झाला असल्याने भारतीय संघासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटन (Inauguration of Ram Temple) सोहळ्यासाठी विराट कोहलीला निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र विराट कोहलीने त्याकडे पाठ फिरवली.

वैयक्तिक कारण देत विराट कोहलीने पहिल्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटीमधून माघार घेतली आहे. पत्राद्वारे विराट कोहलीने BCCI कडे सुट्टी हवी असल्याची विनंती केली. विराट कोहलीच्या विनंतीला मान देत BCCI ने देखील सुट्टी दिली आहे. सध्या विराटची पत्नी अनुष्का शर्मा (anushka sharma) प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंसीच्या कारणामुळे विराट कोहलीने सुट्टी मागितली असल्याची माहिती आहे.

25 जानेवारीला भारतीय संघाला पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. आज अचानक विराट कोहलीच्या सुट्टी संदर्भात बातमी समोर आल्याने, आता बीसीसीआय (BCCI) समोर विराट कोहलीचा पर्याय शोधणे मोठं आव्हान मानले जात आहे. भारतीय संघाची मधली फळी लईत नसल्याने, विराट कोहली बाहेर होणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी सरफराज खानची (sarfaraz khan) निवड केली जाणार आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Rohit Sharma on T20 World Cup: T20 मध्ये मीच कर्णधार असणार; रोहितने या शब्दात साधला पांड्यावर निशाणा..

Virat kohli Ram Mandir Inauguration: निमंत्रण असूनही विराट, धोनी, रोहितने राम मंदिर उद्घाटनाकडे का फिरवली पाठ? हे आहे कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.