अमानवीय कृत्य; प्राध्यापकाने केले विद्यार्थिनीवर अत्याचार!

0

बीड जिल्ह्यातून शिक्षणासाठी संगमनेर येथे आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

आरशू पटेल असं अत्याचार केलेल्या प्राचार्यचे नाव असून तो मुळचा राहता तालुक्यातील हसनापूर गावचा रहिवाशी आहे. हरशू पटेल या प्राचार्यावर तरुणीच्या फिर्यादीनुसार विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्राध्यापक जेलमध्ये असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

महाविद्यालयात प्राध्यापकांकडूनच असे अमानवीय कृत्य होत असेल तर, अशा महाविद्यालयांना वेळीच टाळे ठोकण्याची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याची आवश्यकता आहे. असे सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी आपल्या उद्रेकातून बोलून दाखवले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.