GMC Nagpur Recruitment 2024: 10वी पाससाठी या विभागामध्ये 680 जागांची सरकारी नोकर भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

GMC Nagpur Recruitment 2024: सरकारी नोकरी (government job) करण्याचं अनेकांचे स्वप्न असतं. मात्र उच्च शिक्षण घेऊन देखील अनेकांना नोकरी मिळत नाही. परंतु आता नागपूरमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत ६८० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या संदर्भात अधीसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाणून घेऊया या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर अपडेट.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंतर्गत केल्या जाणाऱ्या ६८० रिक्त जागांसाठी उमेदवारांना 47 हजार 600 रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 देण्यात आली आहे. जाणून घेऊया ऑनलाइन अर्ज कसा करायचा? परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण.

गड ड या पदासाठी 680 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा विषयी सांगायचं झाल्यास, उमेदवारांचे वय हे 18 ते 38 या वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क

एससी/ एसटी या उमेदवारांसाठी 43 ही वयोमर्यादा असणार आहे. ओबीसी उमेदवारांसाठी 41 वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.

पगार/ नोकरीचे ठिकाण

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15000 ते 47 हजार सहाशे दरमहा पगार दिला जाणार आहे. याशिवाय महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील पगाराव्यतिरिक्त दिले जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर जिल्ह्यामध्ये नोकरी करावी लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 रात्री बारापर्यंत असणार आहे.

ऑनलाइन अर्ज  

परीक्षेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ईमेलद्वारे परीक्षेच्या तारखेविषयी सूचित करण्यात येईल. याशिवाय अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही परिक्षे विषयी अपडेट घेऊ शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.gmcnagpur.org/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर अधिकृत वेबसाईट ओपन होईल खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता.

डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

भरती जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा IND vs AFG 1st T20 Live: गिल, जयस्वाल, रिंकू सिंह या तिघांपैकी एकच असणार प्लेइंग 11 मध्ये; जाणून घ्या संघाची मजबुरी..

IND vs AFG 1st T20 playing 11: कितीही चांगला खेळला तरी रिंकू सिंह प्लेइंग इलेव्हनचा भागनसणार; होय ही भारतीय संघाची मजबुरीच..

Chanakya on money: चाणक्यांची ही गोष्ट पाळा खिसा कायम राहील गरम; अन्यथा आयुष्यभर कराल वणवण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.