एकाच कुटुंबातील ४ मुलांची निर्घुन हत्या?

0


‌आई-वडील आपल्या मूळ गावी मध्य  प्रदेश मध्ये गेले असता एकाच कुटुंबातील चार अल्पवयीन मुलांची हत्या करण्यात आली आहे. मनाला चटका लावून जाणारी व माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रावेर शहरानजीक घडली आहे. महताब आणि रुंमली बाई भिलाला हे दांपत्य आपल्या मूळगावी मध्यप्रदेश मध्ये गेले असता त्यांची चार अल्पवयीन मुले घरामध्ये एकटी  होती.

‌ रावेर शहराजवळ असणाऱ्या एक किलोमीटर अंतरावर बोरखेडा रस्त्यावरील असणाऱ्या शेख मुस्तफा यांच्या शेतामध्ये हे दोघेही दांपत्य सालदार म्हणून काम करत होते.
सईता (वय १२), राहुल (११ वर्ष), अनिल (८ वर्ष), सुमन (३ वर्ष) या चौघांचा खून झाल्याचे सकाळी शेतमालक शेख मुस्तफा यांच्या लक्षात आले. त्यांनी ही घटना पोलिसांना कळवली.
याबाबत कळवले असता घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह इतर पोलिस दाखल झाले.
‌घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासोबत श्वान पथक देखील घटनास्थळी उपस्थित झाले.
या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे व हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.