SJVN Limited Recruitment 2023: SJVN मध्ये या उमेदवारांसाठी विविध पदांच्या 400 जागांची भरती.
SJVN Limited Recruitment 2023 जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसजेव्हीएन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी एकूण 400 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांना साथ जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
रिक्त पदे/ शैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी या पदासाठी एकूण 175 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी संपादन केलेला असावा.
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी: टेक्निशियन प्रशिक्षणार्थ या पदासाठी एकूण शंभर रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त तांत्रिक संबंधित शिक्षण शाखेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी आयटीआय या पदासाठी एकूण 125 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संबंधीध विषयामध्ये ट्रेड आयटीआय पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा/ परीक्षा शुल्क
इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेविषयी सांगायचं झाल्यास, उमेदवार हा 18 ते 30 यादरम्यान असणे आवश्यक आहे. ओबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाईल. त्याचबरोबर एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
भरती प्रक्रियेमध्ये सभाग नोंदवण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2024 देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://sjvn.nic.in/ असं सर्च करा. त्यानंतर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. पुढे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा भरतीची जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा..
पगार:
ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये पगार दिला जाईल. टेक्निशियन प्रशिक्षणार्थी डिप्लोमा या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना 8000, टेक्निशियन प्रशिक्षणार्थी आयटीआय या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना 7000 रुपये दरमहा पगार देण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.
हे देखील वाचा
Mumbai Indians: बुमराह नंतर सूर्यकुमार यादवचाही मुंबई इंडियन्सला दणका; पाहा नेमकं काय घडलं..
Shame On MI : हार्दिक पांद्याच्या षडयंत्रात अडकली मुंबई इंडियन्स, अन् बळी गेला रोहीत शर्माचा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम