दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवार

0

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तर होत आहेच. शिवाय पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात जिवीतहानी देखील झाल्याचे पाहिला मिळत आहे.

पंढरपूरमध्ये सोळा तास पडलेल्या पावसामुळे चंद्रभागा तिरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून ६जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे कुंभार घाटाची भिंत कोसळली. आणि ही दुर्दैवी घटना घडली. प्रशासनाने ढिगाऱ्याखालून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. परंतु कोळी समाजाने जोपर्यंत कंत्राटदारावर गुन्हा दाखल होत नाही,तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेतली.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारकडून मदत मिळवून देण्यात येईल. त्याचबरोबर ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असं पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितले. आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करून दिली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.