Chanakya Niti on youngster: तारुण्यात करा या गोष्टी; अन्यथा म्हातारपणात भोगाल नरक यातना..

0

Chanakya Niti on youngster: अनेकांना आपल्या भविष्याची काळजी असते. मात्र प्रत्येक जण भविष्याचा विचार करतोच, असं नाही. जीवन जगत असताना भविष्याविषयी गांभीर्य नसणारी मंडळी बहुसंख्य आहेत. याशिवाय म्हातारपणात आपले आरोग्य निरोगी असायला हवं. सुख-समृद्धीने भरलेलं असावं, वृद्धापकाळामध्ये आपल्याला समाजात मानसन्मान मिळावा. असं देखील अनेकांना वाटतं. तुम्हाला देखील वृद्धापकाळमध्ये कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये असं वाटत असेल, तर चाणक्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथातून त्यांनी सगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. त्यामध्ये कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, जीवन सुखकर बनवायचं असेल तर तारुण्यात काय करायला हवं याविषयी आचार्य चाणक्य यांनी सविस्तर उपदेश केला आहे. वाचा सविस्तर.

आचार्य चाणक्य म्हणतात, लहान वयातच मनुष्यामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची ओढ असायला हवी. दररोज नवनवीन कला अवगत करणे भविष्याच्या दृष्टीने मनुष्यासाठी फायदेशीर ठरतं. लहानपणापासूनच पैशावर प्रेम करण्याची सवय जडली, तर मनुष्याला भविष्यात अडचणीचा सामना करावा लागत नाही, असं चाणक्य सांगतात.

चाणक्य आचार्य सांगतात, आयुष्यात पैशाला जितकं महत्त्व आहे, तितकेच महत्व आरोग्याला देखील आहे. लहान वयामध्ये तुम्हाला व्यायामाची सवय असणे आवश्यक आहे. तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल, तर वृद्धापकाळामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. निरोगी आरोग्य ही खूप मोठी संपत्ती आहे. वृद्धापकाळामध्ये आनंदी आणि सुखी राहायचं असेल, तर तारुण्यात नियमित व्यायाम फार महत्त्वाचा आहे.

लहानपणापासून वडीलधाऱ्या माणसांचा मानसन्मान करणे भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. असं आचार्य चाणक्य सांगतात. समाजात तुम्ही जितके नम्रतेने राहाल, तितकाअधिक मानसन्मान तुम्हाला मिळत जाईल. तरुण वयात कुठल्याही प्रकारचे व्यसन नसणे आवश्यक आहे. चाणक्य सांगतात व्यसनाने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ज्याचा परिणाम वृद्धापकाळामध्ये होतो.

हे देखील वाचा Chanakya quotes: फसव्या बायकांना कसे ओळखाल? चाणक्यांनी सांगितले चार मार्ग..

BCCI Discuss Rohit Sharma | रोहित शर्माने सोडलं कर्णधारपद! वनडे, कसोटी संघात खेळणार; मात्र T-20 तूनही माघार..

Team India head Coach | राहुल द्रविड नंतर या चौघांपैकी एकाच्या गळ्यात पडणार प्रशिक्षक पदाची माळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.