Chanakya quotes: फसव्या बायकांना कसे ओळखाल? चाणक्यांनी सांगितले चार मार्ग..

0

Chanakya quotes: मनुष्य (men) हा समाजशील प्राणी आहे. समाजाच्या चांगल्या वाईट, ओळख करून आपले जीवन जगावे लागते. एकमेकांची मदत, अनेकांचा सहवास या गोष्टीशिवाय जीवनात यशस्वी होणे फार कठीण आहे. प्रत्येकाला एकमेकांना मदत, सहवास लाभत असतो. जीवन जगत असताना या सामान्य गोष्टी आहेत. मात्र यशस्वी जीवनाची वाटचाल करताना आपल्याला कोण उपयुक्त आहे. कोण आपला गैरफायदा घेत आहे, हे समजणे देखील खूप आवश्यक आहे.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी यशस्वी जीवनात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी? तुमचा गैरफायदा कोण घेत आहे? कोणावर विश्वास ठेवावा? याविषयी अचूक मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नितीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. आजही चाणक्य नितीनुसार (Chanakya Niti) आपले जीवन जगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते.

आचार्य चाणक्य सांगतात, जी महिला अधिक चपळ असते. चपळाईने स्वतः ला प्रमोट करते. अशा महिलांवर कधीही विश्वास ठेवू नये. ज्या महिलांना आपल्या वाणीवर नियंत्रण नसतं. विचारांपेक्षा ज्या महिला आपल्या सौंदर्याला अधिक महत्त्व देतात. अशा महिलांचा सहवास लागलीच तोडून टाकावा. असं आचार्य चाणक्य सांगतात.

जीवन जगताना अनेकांचा सहवास लाभतो. मात्र त्या सहवासात आपले कोण? आणि परके कोण? हे तुम्हाला वेळीच कळणे आवश्यक आहे. जो मनुष्य तुमच्या विषयी इतरांकडे चर्चा करतो. वाईट बोलत असतो. अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहिला हवं. एवढेच नाही, तर जो पुरुष तुमच्याजवळ इतरांविषयी वाईट बोलतो. अशांपासून देखील तुम्ही सावध रहाणे आवश्यक आहे. किंबहुना नातं तोडणे देखील फायदेशीर ठरतं.

चाणक्य सांगतात, ज्या माणसांकडे संयम नाही अशा माणसांपासून देखील दोन हात दूर राहणे आवश्यक आहे. कारण अशी माणसे रागाच्या भरात नुकसानदायक निर्णय देखील घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. बऱ्याचदा किरकोळ कारणावरून देखील वाद घालत बसतात. संयम नसलेल्या लोकांमध्ये तुमच्या भावनांची कदर करण्याची क्षमताही नसते. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे.

हे देखील वाचा IND vs AUS World Cup 2023 final: भारत प्रचंड तुल्यबळ, पण त्या एका कारणामुळे ऑस्ट्रेलियाच मारणार बाजी..

Semi Final Pitch Controversy: मुंबई प्रमाणे फायनल सामन्याची खेळपट्टीही बदलली जाणार; विलियम्सनच्या विधानाने..

Chanakya quotes: विशी ओलांडल्यानंतर चुकूनही करू नका ही चूक, अन्यथा जिवंतपणी भोगाल त्या सगळ्या यातना..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.