Semi Final Pitch Controversy: मुंबई प्रमाणे फायनल सामन्याची खेळपट्टीही बदलली जाणार; विलियम्सनच्या विधानाने..

0

Semi Final Pitch Controversy: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand semi final) यांच्यामध्ये पहिला सेमी फायनल सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 70 धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत फायनलचे तिकीट मिळवलं. मात्र सामन्यापूर्वी खेळपट्टीच्या वादाने काही प्रमाणात या सामन्याला गालबोट देखील लागले. रविवारी अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे 2023 वर्ल्ड कप फायनल सामना खेळवला जाणार आहे. (India vs Australia World Cup 2023 Final) सेमी फायनल प्रमाणे आता फायनल सामन्याच्या खेळपट्टीचाही वाद निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षात न्युझीलंड संघाने भारतीय संघाला नॉक आउट सामन्यात अनेकदा पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान होते. मात्र भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ साकारत न्युझीलंड समोर तब्बल 398 धावांचे आव्हान उभे केले. किविंनि संघर्ष केला. मात्र भारतीय संघाने 70 धावांनी विजय साकारला.

भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला असला तरी सामन्यापूर्वी खेळपट्टी बदलल्याने नवा वाद देखील निर्माण झाला होता. सात नंबर खेळपट्टीवर सेमी फायनल सामना होणार होता. मात्र सात ऐवजी सहा क्रमांकाचा खेळपट्टीवर सामना खेळण्यात आला. सहा क्रमांकाच्या खेळपट्टीवर यापूर्वी दोन सामने खेळले गेले होते.

एवढेच नाही, तर खेळपट्टीवरील घास देखील कापण्यात आले होते .जेणेकरून जलदगती गोलंदाजांना मदत मिळू नये. घास कापल्यामुळे स्पिन गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र खेळपट्टीमध्ये फारसा बदल झाला नाही. तू टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला मात्र सपाट खेळपट्टीवर खेळण्याचा फायदा झाला. दुसऱ्या डावात खेळपट्टी स्लो झाली. मात्र फारशी बदलली नाही.

खेळपट्टी विषयी बोलताना न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनने देखील प्रतिक्रिया दिली. विलियम्सन म्हणाला, वापरलेली खेळपट्टी होती. मात्र खेळपट्टी चांगली खेळली. सुरुवातीला फलंदाजासाठी या खेळपट्टीवर मदत होते. त्याचा पुरेपूर फायदा भारतीय फलंदाजांनी उचलला. दुसऱ्या डावात गोलंदाजांना खेळपट्टी मदत करत होती. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या डावात मोठा फरक नव्हता.

एकीकडे न्यूझीलंडने खेळपट्टी विषयी तक्रार केली नसली तरी, इंग्लंड मीडियाने मात्र मोठा रिपोर्ट सादर केला आहे. ICC खेळपट्टी सल्लागाराला विश्वासात न घेता BCCI खेळपट्टीमध्ये छेडछाड करत असल्याचा दावा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मीडियाने केला आहे. एवढेच नाही, तर फायनल सामन्यात देखील बीसीसीआय खेळपट्टीमध्ये छेडछाड करणार असल्याचे म्हंटले आहे.

हे देखील वाचा IND vs NZ WC 2023 Semi-final: सामन्यापूर्वी BCCI ने खेळपट्टी बदलल्याने खळबळ; त्या 6 नंबरच्या खेळपट्टीवर होणार सामना; जाणून प्रकरण..

Chanakya quotes: विशी ओलांडल्यानंतर चुकूनही करू नका ही चूक, अन्यथा जिवंतपणी भोगाल त्या सगळ्या यातना..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.